मास्को आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2021 (Moscow International Film Festival 202) मध्ये मराठी चित्रपटाचा डंका वाजला आहे. 'पगल्या' ( Marathi Film Puglya) असे या चित्रपटाचे नाव आहे. सर्वोत्कृष्ठ भाषा फिचररचा पुरस्कार 'पगल्या' ( Puglya) ने पटकावला आहे. विनोद सॅम पीटर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाच्या कथेबाबत सांगताना विनोद पीटर यांनी सांगितले जेव्हा या चित्रपटाबाबत लोक प्रतिक्रिया व्यक्त करतात ते ऐकून मला प्रचंड आनंद होतो आहे. मास्को आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासारख्या ठिकाणी माझ्या चित्रपटाला सन्मानित केले जाणे ही माझ्यासाठी आणि आमच्या टीमसाठी अत्यंत आनंदाची घटना आहे.
'पगल्या' चित्रपटाचे कथानक हा दोन मुलांच्या भावविश्वाची गुंफन करतो. मुलांमध्ये असलेल्या निरागसतेवर हा चित्रपट आधारीत आहे. चित्रपटात नायक म्हणून आढळणारी दोन मुलं ऋषभ, दत्ता आणि त्यांच्यासोबत असलेले कुत्र्याचे पिल्लू कथानक पुढे सरकवत राहतात. त्यातही या दोन मुलांपैकी एक मुलगा हा गावात राहणारा तर दुसरा शहरातील असतो. गाव आणि शहर आदींमधील आंतरही स्पष्टपणे जाणवते. (हेही वाचा, The Disciple Trailer: दिग्दर्शक चैतन्य ताम्हणे यांच्या 'द डिसायपल' चित्रपटाचा ट्रेलर लाँच; Netflix वर 'या' दिवशी होणार रिलीज, पहा व्हिडिओ)
दरम्यान, 'पगल्या' चित्रपटाला 'मास्को आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2021' मध्ये पारितोषीक मिळण्याआधीही अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. लॉस वर्ल्ड प्रीमियर फिल्म अवॉर्डसमध्येही या चित्रपटाला कॅलिफोर्नियामध्ये सन्मानित करण्यात आले. शिवाय लंडन, इटली, स्वीडन, अर्जेंटीना, लेबनॉन, बेलारूस, ऑस्ट्रेलिया, फिलीपाइन्स, तुर्की, ईरान, रशिया, कजाकिस्तान, स्पेन, इस्राइल, अमेरिका आणि कनाडा आदी ठिकाणी झालेल्या चित्रपट महोत्सवांमध्येही या चित्रपटाचे कौतुक करणयात आले. भारतात सध्या लॉकडाऊन आहे. त्यामुळे हा चित्रपट भारतात अद्याप प्रदर्शीत झाला नाही.