The Disciple Trailer (PC - You Tube)

The Disciple Trailer: आदित्य मोडक (Aditya Modak) यांनी साकारलेल्या शरद नेरुळकर यांच्या आयुष्याचा पाठपुरावा करणाऱ्या 'द डिसायपल' (The Disciple) या बहु-पुरस्कारप्राप्त चित्रपटाचा ट्रेलर नेटफ्लिक्सने मंगळवारी लाँच केला आहे. चैतन्य ताम्हाणे (Chaitanya Tamhane) यांचा वेनिस फिल्म फेस्टिव्हल जिंकणारा चित्रपट 30 एप्रिल 2021 रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. 'द डिसायपल' चित्रपटाची कथा मुंबईतील दाखवण्यात आली आहे. या चित्रपटामध्ये आदित्य मोडक यांनी प्रमुख अभिनेत्याची भूमिका साकारली आहे. तसेच या चित्रपटाला तबलावादक अनीश प्रधान यांची संगीत रचना लाभली आहे.

'द डिसायपल' या मराठी चित्रपटाला 45 व्या टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'एम्प्लिफाई वॉयस अवार्ड' हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. संगीत क्षेत्रातल्या गुरु-शिष्य परंपरेवर हा चित्रपट आधारित आहे. ख्यातनाम युवा दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. दिग्दर्शक फिलीप लॅकॉट यांच्या 'नाइट ऑफ द किंग्स' या चित्रपटाबरोबर हा पुरस्कार विभागून देण्यात आला होता. याशिवाय चैतन्य ताम्हाणे यांच्या 'कोर्ट' या मराठी चित्रपटाला याआधी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. (वाचा - Baipan Bhaari Deva First Poster: केदार शिंदे यांनी जाहीर केला 'बाईपण भारी देवा' आगामी सिनेमा; 28 मे ला होणार रिलीज)

दरम्यान, व्हेनिस चित्रपट महोत्सवातदेखील ‘द डिसायपल’ या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे यांना सर्वोत्कृष्ट पटकथेचा पुरस्कार मिळालेला आहे. द डिसायपल हा चित्रपट शास्रीय संगीत गायकाच्या जीवनाशी निगडीत आहे. युरोपियन सिनेमाच्या मुख्य स्पर्धेत पुरस्कार मिळवणारे चैतन्य ताम्हाणे हे पहिले भारतीय दिग्दर्शक ठरले आहेत.