Baipan Bhaari Deva First Poster: केदार शिंदे यांनी  जाहीर केला 'बाईपण भारी देवा' आगामी सिनेमा; 28 मे ला होणार रिलीज
Baipan Bhari Deva Poster | Photo Credits: Insatagram/ Kedar Shinde

मराठी सिनेसृष्टीमध्ये ट्रेंड सेटर दिग्दर्शक म्हणून ज्याची ओळख आहे असा केदार शिंदे (Kedar Shinde)  पुन्हा आगामी सिनेमाच्या माध्यमातून रसिकांच्या भेटीला येणार आहे. केदार शिंदे ने त्याचा आगामी सिनेमा 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhaari Deva ची घोषणा केली आहे. आज (23 मार्च) सोशल मीडीयाच्या माध्यमातून केदार शिंदेने त्याच्या या आगामी सिनेमाचं पहिलं वहिलं पोस्टर शेअर केले आहे. दरम्यान या पोस्टरवर कलाकारांचा फोटो किंवा नाव टाळलेलं आहे. केवळ लाल सनग्लासेस, चंद्रकोर टिकली मधून 'बाईपण' दाखवण्यात आलं आहे. तर या सिनेमाच्या पोस्टर वर 'नो टेंशन फुल्ल टशन' अशी टॅग लाईन आहे.

केदार शिंदेचा आगामी सिनेमा'बाईपण भारी देवा' या शीर्षकावरून धम्माल कॉमेडीच्या माध्यमातून रसिकांना खिळवणारा असेल याचा अंदाज येत आहे. दरम्यान हा सिनेमा 28 मे 2021 ला प्रदर्शित होणार आहे. स्क्रीनशॉट्स ही निर्मिती संस्था याच सिनेमातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. Bali Teaser: तुमचा थरकाप उडवण्यासाठी येतोय स्वप्नील जोशी याचा आगामी चित्रपट 'बळी', टीझर पाहून व्हाल हैराण (Video).

बाईपण भारी देवा पोस्टर

 

View this post on Instagram

 

A post shared by Kedhar Shinde (@kedaarshinde)

केदार शिंदे हा टेलिव्हिजन, नाटक आणि सिनेमा या तिन्ही क्षेत्रात यशस्वी ठरला आहे. सध्या केदार शिंदेची 'कलर्स मराठी'वर 'सुखी माणसाचा सदरा' ही मालिका सुरू आहे. त्यामध्ये भरत जाधव प्रमुख भूमिकेत आहे. लॉकडाऊन नंतर मनोरंजन क्षेत्र पुन्हा रूळावर येत होतं तेव्हा केदारने या निखळ कॉमेडी मालिकेतून रसिकांचे पुन्हा मनोरंजन करण्यास सुरूवात केली आहे.