Nagin Dance Song (Photo Credits: You Tube)

Kaagar Movie Nagin Dance Song: रिंकू राजगुरूचा (Rinku Rajguru) आगामी सिनेमा 'कागर'(Kaagar) मधील दुसरं गाणं 'नागीण डान्स' नुकतंच रिलीज करण्यात आलं आहे. ट्रेलरला मिळालेल्या दमदार प्रतिसादानंतर आता या सिनेमातील 'नागीण डान्स' या उडत्या चालीचं धम्माल गाणं रसिकांच्या भेटीला आलं आहे. झी म्युजिक मराठी (Zee Music Marathi) युट्युब चॅनेलवरून हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. या गाण्यालाही अल्पावधीतच रसिकांकडून पसंती मिळत आहे. Kaagar Trailer: 'कागर' सिनेमाचा ट्रेलर आऊट; 'जुनं जाणार तेंव्हाच नवं येणार' म्हणत दमदार राजकारण्याच्या भूमिकेत 'रिंकू राजगुरू'

 'नागीण डान्स' गाणं

लग्नाची हळद, वरात ते कोणत्याही सेलिब्रेशनमध्ये हमखास बघायला मिळणारी एक स्टेप म्हणजे 'नागीण डान्स'. सिनेमामध्येही अशाच एका सेलिब्रेशनच्या मूडमध्ये हे गाणं चित्रित करण्यात आलं आहे. 'नागीण डान्स' हे गाणं आदर्श शिंदे आणि प्रवीण कुंवर यांनी गायलं आहे. ए व्ही प्रफुल्लचंद्र यांनी या गाण्याचं संगीत दिगदर्शन केलं असून वैभव देशमुख याने हे गाणं लिहलं आहे. 'लागिलिया गोडी तुझी' या पहिल्या गाण्यालाही प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे.

कागर सिनेमामध्ये रिंकू राजगुरू आणि शुभंकर तावडे ही जोडी एकत्र दिसणार आहे. ग्रामीण राजकारण आणि त्यासोबत फुलणारी प्रेमकहाणी यामधील संघर्ष मांडण्यात आला आहे. कागर सिनेमा हा मकरंद माने दिग्दर्शित आहे. हा सिनेमा 26 एप्रिल 2019 दिवशी रीलिज होणार आहे.