Ganeshotsav 2020: अभिनेता प्रविण तरडे यांचा जाहीर माफिनामा; गणपती प्रतिष्ठापणा वाद, टीका आणि चर्चेवर पडदा
Pravin Tarde With Ganpati | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Ganeshotsav 2020: अभिनेता प्रविण तरडे (Pravin Tarde) यांनी यांनी जाहीर माफी मागत झालेली चूक मान्य आणि दुरुस्त केली आहे. तरडे यांनी त्याबाबत फेसबुकवर (Pravin Tarde Facebook Post) एक व्हिडिओ शेअर करत मनोगत व्यक्त केले आहे. ज्यात तरडे यांनी गणपती प्रतिष्ठापणा (Ganpati Installation) करताना वापरलेली संकल्पना साकारताना झालेली चूक मान्य करताना दिसत आहेत. तरडे यांच्या या व्हिडिओ पोस्टवर अनेकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.

अभिनेता प्रविण तरडे यांनी आपल्या घरी गणपतीची प्रतिष्ठापणा केली आहे. ही प्रतिष्ठापणा करताान तरडे यांनी पुस्तक गपणती ही संकल्पाना साकारली. त्यासाठी गणपतीला पुस्तकांची आरास केली. तरडे यांनी विविध पुस्तकांच्या माध्यमातून बाप्पांची आरास सुरेख केली. मात्र, ज्या पुस्तकावर त्यांनी गणपती बाप्पांना विराजमना केले त्यावरुन टीकेला सुरुवात झाली. भारतीय राज्यघटनेच्या प्रतिवर तरडे यांनी गणपती विराजमान केला. त्यावरुन तरडे यांच्यावर टीकेचा वर्षाव झाला. त्यानंतर तरडे यांनी जाहीर माफी मागत आपली चूक दुरुस्त केली. फेसबुकवर तसा व्हिडिओही शेअर केला. (हेही वाचा, Ganesh Chaturthi 2020: मुख्यमंंत्री उद्धव ठाकरे यांनी कुटुंंबासह वर्षा बंगल्यावर केली गणरायाची पुजा (View Photos))

प्रविण तरडे फेसबुक पोस्ट

तरडे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की,  ''माझ्या घरी पुस्तक गणपती अशी संकल्पना होती. बुद्धीची देवता आणि बुद्धीचं सर्वात मोठं प्रतिक अशी माझी एक भावना होती. परंतू, ती किती मोठी चूक आहे हे मला अनेकांनी  माझ्या लक्षात आणून दिली. यात  आरपीआय, भीम आर्मी तसंच लातूर आणि पुण्यातील संघटनांचा समावेश आहे.. मी सर्व दलित बांधवांची, ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत त्यांची जाहीर माफी मागतो. मी खूप समाजिक भावना जपतो. याआधी कधीच चूक झालेली नाही आणि होणार नाही. जगभरातल्या दलित बांधवांची मी जाहीर माफी मागतो''.