Ganesh Chaturthi 2020: भाद्रपद शुक्ल चतुर्थी निमित्त आज देशविदेशात गणरायाच्या आगमनाचा सोहळा अगदी जल्लोषात साजरा होत आहे. मुंंबईत यंंदा गणेशोत्सव निमित्त होणार्या सोहळ्याचे स्वरुप साधे असले तरी घरगुती स्तरावर मोठ्या उत्साहात बाप्पांचे आदरातिथ्य केले जात आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांंच्या शासकीय निवास स्थानी वर्षा बंगल्यावर गणेशाचे आगमन झाले आहे. आज उद्धव ठाकरे यांनी सह कुटुंंब वर्षा बंगल्यावर गणरायाचे स्वागत करुन विधिवत पुजा अर्चना केली आहे. सध्या या क्षणाचे काही फोटो सुद्धा पाहायला मिळत आहेत. यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या सह त्यांच्या पत्ने रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray), व दोन्ही मुलंं आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आणि तेजस ठाकरे (Tejas Thackeray) पाहायला मिळत आहेत.
मुख्यमंंत्र्यांनी वर्षा बंगल्यावर अत्यंत पारंपारिक स्वरुपात गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. आपण फोटो मध्ये सुद्धा पाहु शकता की अगदी मोजकीच आणि नाजुक सजावट करुन बाप्पांंसाठी मखर बनवण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे, शरद पवार आणि देवेंद्र फडणवीसांनी ट्विटच्या माध्यमातून दिल्या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा
मातोश्री वर गणेश चतुर्थी
Maharashtra: Chief Minister Uddhav Thackeray offers prayers to Lord Ganesha at his residence in Mumbai, on the occasion of #GaneshChaturthi today. pic.twitter.com/VesvsCqRMb
— ANI (@ANI) August 22, 2020
यंंदा गणेशोत्सवावर असणारे कोरोनाचे सावट लक्षात घेता मुख्यमंंत्री उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीपासुन मुंंबईकरांंना काळजी घेण्याचे आवाहन केले होते. सणाचा उत्साह आणि भक्ती महत्वाची असे म्हणत ठाकरे यांंनी यंंदा केवळ चार फुट पर्यंतच्याच मुर्त्यांना परवानगी दिली होती, कौतुकास्पद बाब अशी की या सर्व नियमांचे मुंंबईतील सर्व गणेशोत्सव मंंडळांनी काटेकोरपणे पालन केले आहे.