आज संपूर्ण देशभरात गणपती बाप्पाचे आपल्या भक्ताच्या घरी आगमन झाले. काही दिवसांचा पाहुणा म्हणून आलेल्या या गणरायाचे भक्तीभावाने सारे गणेश भक्त आदरातिथ्य करत आहे. हा उत्साह असाच कायम राहावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray), राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ट्विटच्या माध्यमातून सर्वांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गणराया चरणी नतमस्तक होऊन सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
महाराष्ट्रातील तमाम जनतेला श्री गणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा!
गणपती बाप्पा मोरया! pic.twitter.com/udmpfuFHhB
— ShivSena - शिवसेना (@ShivSena) August 22, 2020
त्याचबरोबर कोरोनोत्तर महाराष्ट्राच्या नवनिर्माणासाठी आम्हा सर्वांना बळ दे असे सांगत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
#गणेशचतुर्थी #गणेशोत्सव2020 #GaneshChaturthi #GanpatiBappaMorya pic.twitter.com/OoMWcnIlEU
— Raj Thackeray (@RajThackeray) August 22, 2020
सकलांना मार्ग दाखवणारा अधिनायक, विघ्नहर्त्या गजाननाने जगावरील कोरोनारूपी संकटाचा नाश करून सर्वांचे मंगल करावे,ही श्रींचरणी प्रार्थना असे सांगत शरद पवारांनी सर्वांना श्रीगणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा दिल्या आहेत.
मनाला प्रसन्न करणारे श्रीगणेशाचे सर्वव्यापक आणि सर्वस्पर्शी रूप हे मानवासाठी सौख्याचे अधिष्ठान आहे. सकलांना मार्ग दाखवणारा अधिनायक, विघ्नहर्त्या गजाननाने जगावरील कोरोनारूपी संकटाचा नाश करून सर्वांचे मंगल करावे,ही श्रींचरणी प्रार्थना. सर्वांना श्रीगणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा! pic.twitter.com/SRgoxaOUAl
— Sharad Pawar (@PawarSpeaks) August 22, 2020
तर देवेंद्र फडणवीस यांनीही गणेशोत्सव पर्वाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत.
मंगलमूर्ती विघ्नहरा,
दूरितनाशना कृपा करा
गणेशोत्सव पर्वाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा ! #GaneshChaturthi2020 #Ganeshotsav #GanpatiBappaMorya pic.twitter.com/SS24rGzooe
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 22, 2020
दरम्यान या पवित्र सणाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), गृहमंत्री अमित शाह (Amit Shah), काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि भाजप नेते नितीन गडकरी (Nitin Gadkari)यांनी ट्विटच्या माध्यमातून जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.