Ganesh Chaturthi 2020: पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, राहुल गांधी, नितीन गडकरीसह या राजकीय नेत्यांनी ट्विटच्या माध्यमातून समस्त देशवासियांना दिल्या गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा
Ganesh Chaturthi Wishes From Politicians (Photo Credits: Pixabay and Twitter)

आज सर्वत्र देशभरात गणेश चतुर्थीचा सण साजरा केला जात आहे. कोरोना व्हायरसमुळे दरवर्षीप्रमाणे दिसणारी धामधूम जरी यावर्षी पाहायला मिळाली नसली तरीही लोकांचा उत्साह मात्र कायम आहे. या पवित्र सणाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), गृहमंत्री अमित शाह (Amit Shah), काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि भाजप नेते नितीन गडकरी (Nitin Gadkari)यांनी ट्विटच्या माध्यमातून जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

त्याचबरोबर केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल (Piyush Goyal)आणि केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar) यांनीही गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या.

गणपती बाप्पाची कृपा आपल्या सर्वांवर कायम राहो असे सांगत पंतप्रधानांनी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

त्याचबरोबर अमित शाह यांनी प्रकाश जावडेकर यांनी फोटो शेअर करुन गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रकाश जावडेकर यांचे ट्विट:

हेदेखील वाचा- Ganesh Chaturthi 2020 निमित्त मुंबई, दिल्ली सह इतर गणेश मंदिरात गणरायाची पूजा संपन्न (Watch Videos)

तर नितीन गडकरी यांनी खास मराठीतून गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. Watch Video

काँग्रेस नेते राहुल गांधी आणि पियुष गोयल यांनीही गणेश चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

पियुष गोयल यांचे ट्विट

दरम्यान गणेशोत्सवानिमित्त (Ganeshotsav) सर्वोच्च न्यायालयाने एक महत्वाचा निर्णय दिला आहे. गणेश चतुर्थीनिमित्त कोणत्याही प्रकारचा उत्सव आयोजित करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. अशा प्रसंगी गर्दीवर नियंत्रण ठेवणे हे कठीण आव्हान असते, असे कोर्टाने म्हटले आहे.