अभिनेत्री Ishwari Deshpande, Shubham Dedge यांचा गोव्यातील बागा-कलंगुट येथे कार अपघातात मृत्यू
Ishwari Deshpande | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

अभिनेत्री ईश्वरी देशपांडे (Ishwari Deshpande) आणि शुभम देडगे (Shubham Dedge) या दोघांचा मृत्यू झाला आहे. गोवा राज्यातील बागा-कलंगुट ( Goa At Baga-Calangute) येथे या दोघांचा अपघाती मृत्यू झाला. कार खाडीत कोसळून हा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सोमवारी पहाटे (२० सप्टेंबर) ही घटना घडली. दोघेही व्यवसायाने अभिनय क्षेत्रात होते. मराठी आणि काही हिंदी मालिका तसेच काही चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय केला आहे. करीअरची सुरुवात होत असतानाच मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. खाडीत गाडी पडल्यानंतर नाकातोंडात पाणी गेल्यामुळे दोघांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

प्राप्त माहितीनुसार, अभिनेत्री ईश्वरी देशपांडे आणि शुभम देडगे हे दोघे बागा-कलंगुट पुलावरुन जात होते. दरम्यान, त्यांचा कारवरील ताबा सुटला आणि ती खाडीत कोसळली. कार नेमके कोण चालवत होते याबाबत माहिती मिळू शकली नाही. मात्र, पहाटेची वेळ असल्याने अपघात झाल्याचे कोणाच्या लक्षात आले नाही. परिणामी नाका-तोंडात पाणी जाऊन दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. (हेही वाचा, Raju Sapte Suicide Case: कला दिग्दर्शक राजू साप्ते आत्महत्या प्रकरणी मुख्य आरोपी राकेश मौर्य याला अटक)

ईश्वरी आणि शुभम हे दोघे पाठिमागील एक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. पाठीमागील अनेक वर्षांपासून ते एकमेकांना ओळखत होते. या ओळखीचे रुपांतर मैत्री आणि पुढे प्रेमात झाले. त्यातून ते एकमेकांना डेट करु लागले. दोघांनीही विवाहबद्ध होण्याचा निर्णय घेतला होता. दोघेही पुढच्या महिन्यात साखरपुडा करणार होते. दरम्यान, संसार सुरु होण्यापूर्वीच नियतीने त्यांच्या आयुष्याचा मार्ग संपवला. ईश्वरी ही पाषाण-सूस परिसरात तर शुभम हा नांदेड सिटी परिसरात वास्तव्याला होते.