मराठी अभिनेत्री हेमांगी कवी नेहमीच विविध विषयांबाबत आपले मत ठामपणे मांडताना दिसत आली आहे. याआधी तिने कामाचे पैसे वेळेवर न देणाऱ्या लोक्नावर खरपूस टीका केली होती. आता तिने एक नव्या विषयाला हात घातला आहे. पाश्चात्य पद्धतीच्या शौचालयाचा (Western Toilets) योग्य पद्धतीने वापर न करणाऱ्या लोकांवर हेमांगीने तोंडसुख घेतले आहे. ही शौचालये अस्वच्छ ठेवली किंवा पुरुषांनी त्यांचा वापर नीट केला नाही तर, महिलांना किती समस्यांचा सामना करावा लागतो यावर हेमांगीने भाष्य केले आहे. याबाबत तिने एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे.
आपल्या पोस्टमध्ये हेमांगी म्हणते, ‘हल्ली बऱ्याच कामाच्या ठिकाणी पाश्चात्य पद्धतीची शौचालये असतात. त्यात काही वेळा स्त्री-पुरुषांकरता एकच शौचालय असते. अश्यावेळी ते शौचालय कसे वापरावे याचे ज्ञान हे शाळेत किंवा घरातच पालकांनी लहानवयात आपल्या मुलामुलींना द्यायला हवे.’ याचे कारण देताना देताना हेमांगी सांगते. ‘पुरुष मूत्र विसर्जन करताना कमोडच्या रिंगच्या आजूबाजूचा भागही ओला करतात, ते बघूनच अंगावर शिसारी येते. स्त्रियांची मूत्र विसर्जन करायची पद्धत या पुरुषांना माहीत नसते का? की याचा विचारच केला जात नाही? की अश्या घाणेरड्या कमोडवर वर त्या कश्या बसत असतील? मासिक पाळीच्या वेळी काय करत असतील याचा विचार होत नाही का?’
पहा पोस्ट -
पुढे ती म्हणते, ‘स्त्री पुरुष दोघांनी कमोड कसे वापरावे हे कळत, माहीत नसेल तर न लाजता विचारावे, शिकून घ्यावे! कारण त्याचा थेट संबंध दोघांच्या ही आरोग्याशी आहे. सर्वांनी या विषयावर न लाजता बोलाबे.’ पुढे हेमांगीने जे लोक फ्लश करत नाहीत त्यांच्यावरही टीकास्त्र डागले आहे. ती म्हणते. ‘कित्येकदा काहीजण आपला कार्यभाग उरकल्यावर फ्लशही करत नाहीत... अरे काय? एक वतन दाबायचे असते फक्त... तेवध्ये ही होऊ नये आपल्याकडून?’
शेवटी तिने स्वतःचा लोकांना कमोड कसे वापरावे याबाबत माहिती दिली आहे. ‘पुरुषांनी मूत्र विसर्जन करताना कमोडची रिंग वर करून आपला कार्यभाग उरकून, फ्लश करून झाल्यावर पुन्हा ती फ्रेम खाली पाडायची असते.’ (हेही वाचा: पैसे थकवणाऱ्या लोकांवर भडकली अभिनेत्री हेमांगी कवी; 'पैशांसाठी सतत फोन करायचे, मेसेजेस करायचे...', See Post)
हेमांगीच्या या पोस्टला अनेकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. अनेक पुरुषांनीही आपल्यालाही अशा अस्वच्छ शौचालयाची किळस वाटते असे सांगितले आहे.