Mahesh Manjrekar | (Photo Credits: Instagram)

सोलापूर-पुणे महामार्गावर कारला धडक बसल्याने झालेल्या बाचाबाचीत अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजेरकर (Mahesh Manjrekar) यांनी एका व्यक्तीला शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना समोर येत आहे. याप्रकरणी महेश मांजरेकर यांच्या विरुद्ध संबंधित व्यक्तीने यवत पोलिस स्थानकात (Yavat Police Station) गुन्हा दाखल केला आहे. तसंच महेश मांजरेकर यांनी पोलिस ठाण्यात येण्यास नकार दिल्याचेही तक्रारदाराने म्हटले आहे. शुक्रवार, 15 जानेवारीची ही घटना आहे.

तक्रारदारने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, पुण्याहून टेंभुर्णीकडे जात असातना एका गाडीने माझ्या गाडीला ओव्हरटेक केलं आणि पुढे जावून अचानक ब्रेक मारला. त्यामुळे पाठीमागून येणारी माझी गाडी त्यांच्या गाडीला धडकली. त्यानंतर पुढच्या गाडीतून महेश मांजरेकर आणि त्यांचे साथीदार खाली उतरले. नुकसान भरपाईची मागणी करु लागले. त्यादरम्यान, झालेल्या बाचाबाचीत त्यांनी शिवीगाळ आणि मारहणही केली. (Mahesh Manjrekar Receives Extortion Call: दिग्दर्शक, अभिनेते महेश मांजरेकर यांना अबू सालेम याच्या नावाने 35 कोटींच्या खंडणीसाठी फोन; आरोपी अटकेत)

ANI Tweet:

दरम्यान, माझ्या गाडीला त्यांच्या गाडीने धडक दिली. गाडीतील तिघांनीही मद्यप्राशन केले होते. जाब विचारताच त्यांनी अरेरावी केली. मला उशीर होत होता म्हणून मी तेथून निघालो. यात माझ्या नव्या मर्सडीज गाडीचं नुकसान झालं आहे, अशी प्रतिक्रीया महेश मांजरेकर यांनी दिली आहे.