Mahesh Manjrekar (Photo Credits: Twitter)

दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांना अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम (Underworld Don Abu Salem) याच्या नावाने खंडणीसाठी फोन आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. फोन करणाऱ्या व्यक्तीने 35 कोटी रुपयांची मागणी केली होती. त्या व्यक्तीला खंडणीविरोधी सेलकडून अटक करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) दिली आहे.

काल 26 ऑगस्ट रोजी महेश मांजरेकर यांना खंडणीसाठी फोन आला होता. त्यानंतर त्यांनी दादर पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तातडीने पाऊल उचलली आणि आरोपीला अटक केली. हा आरोपी खेडचा असल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. दरम्यान या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस करत आहे. तसंच या व्यक्तीचा अबू सालेमशी काय संबंध आहे, याचीही चौकशी केली जाईल.

ANI Tweet:

महेश मांजरेकर हा मराठी-हिंदी सिनेसृष्टीतील एक नावाजलेला चेहरा आहे. 'काकस्पर्श', 'मी शिवाजी राजे भोसले बोलतोय' यांसारख्या अनेक मराठी सिनेमातून आणि 'दबंग', 'वॉन्टेड' यांसारख्या हिंदी सिनेमातून ते आपल्या भेटीला आले आहेत. तसंच मराठी बिग बॉसचे होस्टिंग करतानाही आपण त्यांना पाहिले आहे.