Mahesh Manjrekar (Photo Credits: File)

Mahesh Manjrekar 62nd Birthday: मराठी रंगभूमी पासून आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात करुन उत्तम दिग्दर्शक, निर्माते, लेखक, पार्श्वगायक, स्पर्धक ते मराठीतील एका लोकप्रिय शो चे सूत्रसंचालक म्हणून यशस्वी ठरलेले अभिनेता महेश वामन मांजरेकर (Mahesh Vaman Manjrekar) यांचा आज 62 वा वाढदिवस. त्यांची रुपेरी पडद्यावरचा प्रवास हा खरंच कौतुकास्पद आहे. मराठी रंगभूमीवरून सुरुवात अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवणा-या महेश मांजरेकरांनी हॉलिवूड चित्रपटापर्यंत मजल मारली. ऑस्कर पुरस्काराचा मानकरी ठरलेल्या 'स्लमडॉग मिलेनियर' यातील त्यांची भूमिका प्रचंड गाजली. जाणून घेऊया महेश मांजरेकरांच्या मराठी, हिंदी, इंग्रजी चित्रपटामधील यशस्वी प्रवासाविषयी काही खास गोष्टी.

जाणून घेऊया महेश मांजरेकरांनी अभिनेता, दिग्दर्शक, निर्माते म्हणून पदार्पण केलेले पहिले चित्रपट आणि कार्यक्रम

हेदेखील वाचा- महेश मांजरेकर यांनी कोविड योद्धांसाठी रचले 'We Can, We Shall' हे गाणे, सिद्धार्थ जाधव, अमृता खानविलकरसह अनेक मराठी कलाकारांचा सहभाग, Watch Video

1. अभिनेता म्हणून मराठीतील पहिला चित्रपट- जीवा सखा (1992)

2. अभिनेता म्हणून हिंदीतील पहिला चित्रपट- मेरे इश्क की कहानी (2001)

3.अभिनेता म्हणून हॉलिवूडमधील पहिला चित्रपट- स्लमडॉग मिलियनेयर (2008)

4. दिग्दर्शक म्हणून मराठीतील पहिला चित्रपट- आई (1995)

5. दिग्दर्शक म्हणून बॉलिवूडमधील पहिला चित्रपट- वास्तव: द रियल्टी (1999)

6. निर्माता म्हणून बॉलिवूडमधील पहिला चित्रपट- प्राण जाए पर शान न जाएं (2003)

7. स्पर्धक म्हणून हिंदीतील रिअॅलिटी शो- झलक दिखला जा सीजन 1 (2006)

8. सूत्रसंचालक म्हणून मराठीतील पहिला शो- बिग बॉस (2018)

इतकच नव्हे तर त्यांनी तेलगु चित्रपट ओक्काडुन्नडु (2007) य़ामध्ये देखील काम केले आहे. थोडक्यात महेश मांजरेकर यांचा रुपेरी पडद्यावरील प्रवास वाखाणण्याजोगा आहे. वयाच्या 62 व्या वर्षी हा उत्साह, एनर्जी, क्रिएटिव्हिटी कायम आहे. आपल्या चाहत्यांसाठी नवनवीन गोष्टी करण्यासाठी ते नेहमीच आग्रही असतात. अशा या हरहुन्नरी कलाकाराला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!