प्रेक्षकांची इतक्या दिवसांची उत्सुकता आणि प्रतीक्षा संपली आहे, कारण १६ सप्टेंबरपासून भारतीय छोट्या पडद्यावरील सर्वात वादग्रस्त टीव्ही शो बिग बॉसला सुरुवात झाली. हे या शोचे १२वे पर्व आहे. शोची तारीख ठरल्यापासूनच शोमध्ये कोण कोण स्पर्धक असणार आहेत याबद्दलच्या चर्चेला उधाण आले होते. बिग बॉसचे ११ वे पर्व गाजवले शिल्पा शिंदे या मराठी मुलीमुळे, १२व्या पर्वात कोणी मराठी स्पर्धक असणार का? असा प्रश्नही अनेकांच्या मनात होता. तर आता बिग बॉसचे १२ वे पर्व गाजवण्यासाठी सहभागी झाली आहे मराठमोळी ग्लॅमरस अभिनेत्री नेहा पेंडसे.
कोण आहे नेहा पेंडसे ?
३३ वर्षीय नेहा पेंडसेचा जन्म मुंबई मध्ये झाला. वयाच्या १० व्या वर्षी ‘कॅप्टन हाउस’ मधून नेहाने आपल्या करियरला सुरुवात केला. मराठीसोबतच हिंदी, तमिळ, तेलुगु, कन्नड, मल्याळम अशा विविध भाषांमध्ये काम केलेल्या नेहा पेंडसला मराठी मालिका ‘भाग्यलक्ष्मी’पासून प्रसिद्धी मिळाली. टुरिंग टॉकिज, बाळकडू, नटसम्राट अशा चित्रपटांमध्येही तिने काम केलं आहे. फॅमिली टाईम विथ कपिलमध्येही नेहा दिसली होती, तसेच 'मे आय कम इन मॅडम?' या विनोदी मालिकेतील तिची भूमिकाही गाजली होती. एकेकाळी ‘जाड’ म्हणून हिणवली गेलेली नेहा आता अतिशय स्लीम आणि फिट आहे. सोशल मिडियावर सक्रिय असलेली नेहा आपल्या हॉट आणि बोल्ड अंदाजातील फोटोमुळे कायमच चर्चेत असते. नुकताच नेहाचा बोल्ड अवतारातील पोल डान्सचा व्हिडीओही व्हायरल झाला होता. त्यामुळे 'बिग बॉसच्या 12' व्या सिझनमध्ये ती काय धुमाकुळ घालणार हेही पाहणे आता रंजक ठरणार आहे.
'विचित्र जोड्या' अशी यंदाच्या बिग बॉसची थीम असून सेलिब्रेटींसह सामान्य नागरिकांचाही या पर्वात समावेश आहे. सहा जोड्या आणि पाच सोलो स्पर्धकांनी बिग बॉसच्या घरात पाऊल ठेवले आहे. बीच थीम असलेल्या बिग बॉसच्या घरातील सदस्यांवर ८९ कॅमेरांची नजर असेल.
इतर स्पर्धक -
सहभागी झालेल्या सेलिब्रिटींमध्ये अनुप जलोटा व त्यांची 28 वर्षांची गर्लफ्रेण्ड जसलीन मथरु, नेहा पेंडसे, दीपिका कक्कर इब्राहिम, अभिनेता करणवीर बोहरा, अभिनेत्री सृष्टी रोडे, माजी क्रिकेटपटू श्रीशांत यांचा समावेश आहे.
सामान्य नागरिक : पोलिस कर्मचारी निर्मल सिंग आणि वकील रोमिल चौधरी (हरियाणा), शेतकरी सौरभ पटेल आणि बिझनेसमन शिवाशिष मिश्रा (मध्य प्रदेश), 'गँग्ज ऑफ वासेपूर' फेम गायक दीपक ठाकूर आणि त्याची चाहती उर्वशी वाणी, सबा खान आणि सोमी खान - बहिणी (राजस्थान), पब्लिक वोटिंगद्वारे आऊटहाऊस विजेते - रश्मी बनिक (कोलकाता) रोडीज् स्पर्धक कृती वर्मा यांचा समावेश आहे.
View this post on Instagram
View this post on Instagram
SBS party... So exhausted... Not sure wearing a suit or a night suit #needsleep #bed # calling