एकेकाळी फक्त हरियाणामधींच लोक जिच्या ठुमक्यांचे दिवाने होते, आज त्या सपना चौधरीची एक झलक पाहण्यासाठी भारतात इतर ठिकाणीही लाखोंच्या संख्येने लोक गर्दी करताना दिसत आहेत. म्हणूनच बिग बॉसमुळे घराघरात पोहचलेल्या सपनाची लोकप्रियता आज शोच्या माध्यमातून वाढत आहे. सपनाचा असाच एक लाईव्ह शो बिहार मधील बेगुसराय येथे आयोजित केला होता. या कार्यक्रमावेळी झालेल्या गोंधळात, गर्दीचा संयम सुटल्याने झालेल्या लाठीमारात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
तर बेगुसराय येथे सपनाचा लाईव्ह प्रोगाम सुरू होता. सुदेश भोसले व हंसराज हंस यांच्यासह सपना या कार्यक्रमासाठी पोहोचली होती. रात्री बाराच्या सुमारास सपना स्टेजवर पोहचली. या कार्यक्रमावेळी सपनाला पाहण्यासाठी प्रेक्षकांची तोबा गर्दी झाली होती. मात्र स्टेजवर सपनाचे पाउल पडताच, सपनाला जवळून पाहण्यासाठी लोक स्टेजकडे धावत सुटले. अशावेळी इतक्या संख्येने लोक धावत सुटल्याने पोलिसांचे गर्दीवरील नियंत्रण सुटले आणि एकच गोंधळ माजला. लोकांनी एकमेकांवर खुर्च्या फेकून मारल्या. अखेर गर्दीला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. यादरम्यान एका व्यक्तिचा मृत्यू झाला आहे. तरी या गोंधळात सपनाने 2 गाणी सादर केली.
या कार्यक्रमासाठी जवळजवळ 50 हजार पेक्षा जास्त लोक उपस्थित राहिले होते. सपना स्टेजवर पोहोचताच तिचे हे दिवाने पागल झाले आणि तिचे जवळून एक झलक पाहण्यासाठी सर्वांनी स्टेजकडे धाव घेतली. पण गर्दी अनियंत्रित झाल्याने आयोजकांना कार्यक्रम मध्येच थांबवावा लागला. गर्दी जुमानत नाहीये, हे पाहून पोलिसांना लाठीमार करावा लागला. कार्यक्रमादरम्यान झालेली चेंगराचेगरी आणि लाठीमारात जवळजवळ 15 लोक जखमी झाले आहेत, तर एका व्यक्तिचा मृत्यू झाला. मृताचे नाव साजन कुमार असल्याचे कळते. तो बडिया येथे राहणारा आहे.