Mandira Bedi With Daughter Tara (Photo Credits: Instagram)

अभिनेत्री मंदिरा बेदीने (Mandira Bedi) काही दिवसांपूर्वीच पती राज कौशलला गमावलं आहे. आज मंदिराची दत्तक मुलगी ताराचा (Tara)  पाचवा वाढदिवस आहे. आणि त्यानिमित्ताने मंदिराने कुटूंबियांसोबतचे खास फोटोज शेअर करत ताराचा बर्थ डे सेलिब्रेट केला आहे. यावेळी मंदिराने तारासाठी एक खास पोस्ट देखील लिहली आहे. 'आज 28 जुलै, तुझा आमच्या आयुष्यात येऊन एक वर्षाचा काळ पूर्ण झाला. आज तुझा पाचवा बर्थ डे आहे. माझ्या तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे.' अशा आशयाची मंदिराची पोस्ट आहे. यावेळी मंदिराने तारा, मुलगा वीर आणि पती राज सोबतचा फोटो शेअर केला आहे.

दरम्यान मंदिराच्या या पोस्ट वर अनेक कलाकारांनी, मंदिराच्या निकटवर्तीयांनी ताराला शुभेच्छा दिल्या आहेत. नक्की वाचा: पती Raj Kaushal यांच्या निधनानंतर Mandira Bedi ने सोशल मीडियावर केला 'हा' मोठा बदल!

मंदिरा बेदी पोस्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by Mandira Bedi (@mandirabedi)

तारा ही मंदिरा आणि राज यांची दत्तक मुलगी आहे. मागील वर्षीच मंदिराने तिला दत्तक घेऊन घरात समाविष्ट करून घेतले. त्यावेळी तारासाठी मंदिराने खास व्हिडिओ बनवला होता. दरम्यान मंदिरा तारा सोबतचे स्पेशल क्षण शेअर करत असते.