पती Raj Kaushal यांच्या निधनानंतर Mandira Bedi ने सोशल मीडियावर केला 'हा' मोठा बदल!
Mandira Bedi & Raj Kaushal (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री आणि क्रिकेट होस्ट मंदिरा बेदी (Mandira Bedi) सध्या एका कठीण काळातून जात आहे. काही दिवसांपूर्वीच तिचे पती राज कौशल (Raj Kaushal) यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. गेल्या रविवारी मंदिराने पती आणि आपल्या मित्रपरिवारासोबत पार्टी केली. त्यानंतर अवघ्या दोन दिवसांच त्यांनी घेतलेली अकाली एक्झिट कुटुंबियांसाठी खूपच धक्कादायक आहे. हा धक्का इतका जबर आहे की त्याची छाया आता मंदिरा बेदीच्या सोशल मीडिया अकाऊंट देखील दिसत आहे. पतीच्या निधनानंतर मंदिराने सोशल मीडियावर मोठा बदल केला आहे.

मंदिराने इंस्टाग्राम प्रोफाईल फोटो बदलून ब्लॅक बॅकग्राऊंट ठेवला आहे. पहा मंदिराच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर झालेला हा बदल... (पती Raj Kaushal याला अंतिम निरोप देताना Mandira Bedi ला अश्रू अनावर, See Pics)

Mandira Bedi Instagram Profile (Photo Credits: Instagram)

दरम्यान, काल शनिवार, 3 जुलै रोजी राज कौशल यांच्या प्रेयर मीटचे देखील आयोजन करण्यात आले होते. या मीटला अभिनेत्री मौनी रॉय, विद्या मालवडे समवेत अन्य कलाकारांनी उपस्थिती लावली होती. प्रेयर मीट मधील राज कौशल यांचा फोटो शेअर करत मौनी रॉयने भावूक कॅप्शन दिले. त्यात ती लिहिते, "आम्ही तुला मीस करतो. गोष्टी पुन्हा कधीच पूर्वीसारख्या होणार नाहीत."

 

View this post on Instagram

 

A post shared by mon (@imouniroy)

विशेष म्हणजे मंदिरा बेदीने स्वत: पतीच्या पार्थिव शरीराला खांदा दिला होता. तसंच तिनेचं सर्व अंतिम संस्कार केले आणि सहाश्रू पतीला अंतिम निरोप दिला.