Raj Kaushal Funeral Photos: अभिनेत्री मंदिरा बेदी (Mandira Bedi) हिचे पती राज कौशल (Raj Kaushal) यांचे आज (बुधवार, 30 जून) सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मुंबई (Mumbai) मधील त्यांच्या निवासस्थानावरुन त्यांची अंतिम यात्रा काढण्यात आली. यावेळी सिनेसृष्टीतील त्यांचे मित्र, शुभचिंतक उपस्थित होते. अभिनेता रोनित रॉय, आशीष चौधरी, शिल्पा सकलानी आणि अपूर्व अग्निहोत्री यांच्यासमवेत अन्य काही मंडळी अंतिम यात्रेवेळी हजेरी लावली. (Mandira Bedi हिचे पती Raj Kaushal यांचं निधन)
राज कौशाल यांच्या अंत्ययात्रेचे काही फोटोज सोशल मीडियावरुन समोर आले आहेत. यात मंदिरा बेदी भावूक झाल्याचे दिसत आहे. पतीला अंतिम निरोप देताना मंदिराला अश्रू अनावर झाले. यावेळी अभिनेता रोनित रॉय याने तिचे सांत्वन केल्याचे फोटोत पाहायला मिळत आहे. राज कौशल यांचा अकाली मृत्यू कुटुंबियांसह मित्रपरिवासाठी जबर धक्का आहे.
पहा फोटोज:
राज कौशल हे फ्लिम निर्माते असून त्यांनी 'प्यार मे कभी कभी' आणि 'शादी का लड्डू' यांसारख्या सिनेमांचे दिग्दर्शन केले आहे. यासोबतच काही जाहिरातींसाठी काम केले होते. दरम्यान, मंदिरा-राज यांचे 1999 मध्ये लग्न झाले असून दोघांना दोन मुले आहेत. वीर 9 वर्षांचा असून 4 वर्षीय तारा हिला गेल्याच वर्षी त्यांनी दत्तक घेतले होते.
दरम्यान, राज कौशल सोशल मीडियावर सक्रीय होते. कालच त्यांनी मंदिरा बेदी, अंगद बेदी, नेहा धुपिया, आशिष चौधरी, झहिर खान आणि सागरिका घाटगे यांच्यासोबत पार्टी करणारा फोटो शेअर केला होता. ती त्यांची अखेरची पोस्ट ठरली आहे.