Mandira Bedi हिचे पती Raj Kaushal यांचं निधन
Raj Kaushal passed away (Photo Credits: Twitter)

Mandira Bedi's Husband Passes Away: बॉलिवूड अभिनेत्री आणि क्रिकेट होस्ट मंदिरा बेदी हिचे पती राज कौशल (Raj Kaushal) यांचे निधन झाले आहे. कार्डियाक अरेस्टमुळे त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी आज (बुधवार, 30 जून) सकाळी समोर आली आहे. मंदिरा आणि तिचे पती यांचे खास मित्र आशिष चौधरी यांना आज सकाळी त्यांच्या घराबाहेर स्पॉट करण्यात आले. त्यानंतर त्यांनी राज कौशल यांच्या निधनाची बातमी मीडियाला दिली.

राज कौशल हे फ्लिम निर्माते असून त्यांनी 'प्यार मे कभी कभी' आणि 'शादी का लड्डू' यांसारख्या सिनेमांचे दिग्दर्शन केले आहे. यासोबतच काही जाहिरातींसाठी काम केले आहे. सिनेमा निर्माते ओनिर यांनी राज कौशल यांच्या निधनानंतर ट्विटरवर भावूक पोस्ट शेअर केली आहे. तसंच Viral Bhayani यांनी देखील राज यांच्या निधनाची बातमी ट्विट करत मंदिरा बेदी आणि त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केली आहे.

Viral Bhayani Tweet:

सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असणारे राज कौशल यांनी नुकताच मंदिरा बेदी, अंगद बेदी, नेहा धुपिया, आशिष चौधरी, झहिर खान आणि सागरिका घाटगे यांच्यासोबत पार्टी करणारा फोटो शेअर केला होता. ही त्यांची अखेरची पोस्ट ठरली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Raj Kaushal (@rajkaushal)

मंदिरा आणि राज कौशल यांचे 1999 मध्ये लग्न झाले होते. दोघांना वीर हा 9 वर्षांचा मुलगा असून तारा या 4 वर्षीय मुलीला मागील वर्षी दत्तक घेतले होते. याची माहिती त्यांनी इंस्टाग्राम पोस्टद्वारे दिली होती.