Lata Mangeshkar (File Photo)

भारताची गानकोकीळा लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचं गाण्याइतकंच प्रेम क्रिकेटवरही आहे. काल ( 10 जुलै) भारत विरूद्ध न्युझिलंड या वर्ल्डकप 2019 च्या सेमी फायनलमध्ये भारताचा झालेला पराभव अनेक क्रिकेटप्रेमींच्या जिव्हारी लागला. टीम इंडियाची ढेपाळलेली फलंदाजांची कामगिरी या सामन्यात एम. एस धोनीने सांभाळली. मात्र रन आऊट झालेल्या धोनीच्या डोळ्यात अश्रू तरळले आणि त्याच्या फॅन्समध्येही निराशा आली. याप्रकारानंतर एम एस धोनीने (M S Dhoni) क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ नये यासाठी ट्विटरवर मेसेजेसचा पाऊस सुरू झाला. आता यामध्ये लता मंगेशकर यांचाही समावेश आहे. त्यांनीही धोनीला क्रिकेटमधून निवृत्तीचा विचारही करू नका! असं भावनिक आवाहन केलं आहे. तर टीम इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी लतादीदींनी प्रसिद्ध गीतकार गुलजार यांचं 'अकाश के उस पार भी' हे गाणं शेअर केलं आहे. एम एस धोनीचा हा व्हिडिओ पाहताच प्रत्येक भारतीय चाहत्यांचे अश्रू अनावर होतील, पहा हा इमोशनल Video

लता मंगेशकरांचं ट्वीट

 'अकाश के उस पार भी' गाणं टीम इंडियासाठी 

एम. एस. धोनी, मी आज काल ऐकतेय की तुम्ही क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा विचार करताय. पण कृपया आपण असा विचारही करू नका. देशाला तुमच्या खेळाची गरज आहे आणि माझी तुम्हांला विनंती आहे की तुम्ही निवृत्तीचा विचार करू नये.  IND vs NZ, World Cup 2019 Semi-Final मॅचमध्ये पराभवानंतर केन विल्यम्सन कडून एम एस धोनी साठी खास ऑफर, पहा (Video)

भारत-न्यूझीलंड यांच्यातील अटीतटीच्या सामन्यात शेवटच्या 11 चेंडूत भारताला 25 धावांची गरज होती. 49व्या ओव्हरमध्ये रन करण्याच्या प्रयत्नामध्ये धोनी रन आऊट झाला. सामन्यानंतर मीडीयाशी बोलताना कॅप्टन विराट कोहलीने आपल्याशी अद्याप धोनीने निवृत्तीबद्दल काहीच चर्चा न केल्याचं म्हटलं आहे.