Wellington [New Zealand], March 3 (ANI):Kane Williamson's unbeaten century went in vain as England held on their nerves to defeat New Zealand by four runs in the third ODI of the five-match series here at the Wellington Regional Stadium on Saturday.

आयसीसी (ICC) क्रिकेट विश्वचषक क्रिकेट 2019 स्पर्धेत भारतीय संघाला 18 धावांनी पराभवाचा पत्करावा लागला. याचबरोबर टीम इंडिया (Indian Team) विश्वचषकमधून बाहेर पडली. न्यूझीलंडने चांगला खेळ करत अंतिम सामन्यात धडक मारली. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करत न्यूझीलंडने 239 धावा केल्या. त्यानंतर प्रत्युत्तरादाखल खेळताना भारताला 221 धावांपर्यंत मजल मारता आली. एकवेळ भारताची अवस्था 6 बाद 92 अशी झाली होती. त्यानंतर माजी कर्णधार एम एस धोनी (MS Dhoni) आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांनी 116 धावांची भागिदारी करून भारताच्या विजयाच्या आशा निर्माण केल्या. (IND vs NZ, World Cup Semi-Final 2019: 'फक्त 45 मिनिटांच्या खेळीमुळे हरलो', न्यूझीलंड विरुद्ध पराभवावर विराट कोहली याचे स्पष्टीकरण)

सामना संपल्यावर एकीकडे जडेजाच्या फलंदाजीचे कौतुक होत आहे तर दुसरीकडे धोनीच्या खेळीबाबत टीका केली जात आहे. एकीकडे जडेजा आक्रमक खेळी करत होता तर दुसरीकडे धोनी सावध खेळी करताना दिसला. सामना संपल्यानंतर बोलताना टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (VIrat Kohli) याने धोनीची पाठराखण केली पण न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सन (Kane Williamson) याने धोनीनं नागरिकत्व बदलायची ऑफरच टाकली.

सामना संपल्यावर पत्रकारांशी बोलताना विल्यम्सनला विचारण्यात आलं की, भारताच्या पराभवानंतर धोनीला जबाबदार धरलं जात आहे. त्याला तू संघात घेशील का? यावर तो म्हणाला की, "धोनी वर्ल्ड क्लास खेळाडू आहे. त्याने जडेजासोबत जी भागिदारी केली ती महत्त्वाची होती. त्यानं नागरिकत्व बदललं तर नक्कीच विचार करता येईल".