आयसीसी (ICC) क्रिकेट विश्वचषक न्यूझीलंड (New Zealand) विरुद्ध सेमीफायनलमध्ये भारतीय संघाला (Indian Team) केवळ 18 धावांनी पराभव पत्करावा लागल्याने टीमचे तिसरे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न भंग झाले आहेत. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 239 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा संघ 221 धावा करू शकला. न्यूझीलंडविरुद्ध भारताचे आघाडीचे फलंदाज-रोहित शर्मा (Rohit Sharma), के एल राहुल (KL Rahul) आणि कर्णधार विराट कोहली (Virat Kohli_ स्वस्तात माघारी परतले. टीम इंडियाच्या या तुफानी खेळाडूंना फक्त 1 धाव करता आली. त्यानंतर, एम एस धोनी (MS Dhoni) आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांनी शतकी भागीदारी केली पण संघाला विजय मिळवून देता आला नाही. (IND vs NZ, World Cup 2019 Semi-Final मॅचमधील एम एस धोनीचा हा व्हिडिओ पाहताच प्रत्येक भारतीय चाहत्यांचे अश्रू अनावर होतील, पहा हा इमोशनल Video)
दरम्यान, महत्वाच्या सामन्यात पराभवावर स्पष्टीकरण देताना कर्णधार कोहली म्हणाला, "भारत फक्त 45 मिनीटांच्या खेळीमुळं हरला". शिवाय त्याने धोनी आणि जडेजाची कौतुक करत दुःख देखील व्यक्त केले. "वाईट वाटत आहे. जेव्हा तुम्ही संपुर्ण स्पर्धेत चांगली कामगिरी करता आणि शेवटच्या 5 मिनिटांत तुम्ही स्पर्धेबाहेर होता".
दुसरीकडे, जडेजा आणि धोनी बाद झाल्याने भारताच्या हातातून सामना निसटला. त्याआधी जडेजा 77 धावा करत बाद झाला होता. मार्टिन गुप्टिलनं (Martin Guptill) मोक्याच्या क्षणी धोनीला धावबाद केले आणि सामन्याचे चित्र बदलले. 49 धावांवर खेळत असताना दोन धावा काढण्याच्या नादात धोनी 50 धावांवर रनआऊट बाद झाला. धोनी मैदानात असेपर्यंत भारताला विजयाच्या आशा होत्या, मात्र, तो धावबाद होताच भारताचा डाव संपुष्टात आला.
WHAT A MOMENT OF BRILLIANCE!
Martin Guptill was 🔛🎯 to run out MS Dhoni and help send New Zealand to their second consecutive @cricketworldcup final! #CWC19 pic.twitter.com/i84pTIrYbk
— ICC (@ICC) July 10, 2019