IND vs NZ, World Cup 2019 Semi-Final मॅचमधील एम एस धोनीचा हा व्हिडिओ पाहताच प्रत्येक भारतीय चाहत्यांचे अश्रू अनावर होतील, पहा हा इमोशनल Video
(Photo Credits: Twitter)

आयसीसी (ICC) विश्वचषकच्या पहिल्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंड (New Zealand) विरुद्ध पराभव झाल्याने भारतीय संघाचे आव्हान संपुष्टात आले आहे. यंदाचा विश्वकप सामना भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंघ धोनी (Mahendra Singh Dhoni) यांचा शेवटचा सामना होता. 38 वर्षीय धोनी पुढील विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाच्या निळ्या जर्सीत दिसणार नाही. न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडिया (Indian Team)च्या अंतिम सामन्यात धोनीने 72 चेंडूत 50 धावांची महत्वाची खेळी केली. दरम्यान, सध्या धोनीचा बाद झाल्यावरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. (ICC World Cup 2019: न्यूझीलंड विरुद्ध सेमीफाइनलमध्ये Team India पराभूत पण या खेळाडूने जिंकली संगळ्यांची मनं)

न्यूझीलंड विरोधात धोनीला सहाव्या क्रमाकांवर फलंदाजीसाठी पाठवण्यात आले होते. धोनी अर्धशतकी खेळीकरून धावबाद झाला. धोनीचा बद्द झाल्यानंतरचा एक व्हिडिओ एका ट्विटर यूजरने शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये धोनी पॅव्हेलियनकडे परत जात दिसत आहे. त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावर निराशा आहे. व्हिडिओ पाहून प्रत्येक भारतीय फॅनचे डोळे ओलसर होतील. पहा हा व्हिडिओ:

न्यूझीलंड विरोधात धोनीला सहाव्या क्रमाकांवर फलंदाजीसाठी पाठवण्यात आले होते. यावरून नव्या वादाला तोंड फुटले, कारण दिनेश कार्तिक (Dinesh Karthik)केवळ 6 धावांवर बाद झाला. त्यामुळे त्याचा जागी धोनीला फलंदाजी देण्याची गरज होती. धोनीने रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) च्या साथीने शतकी भागीदारी केली.