ICC World Cup 2019: न्यूझीलंड विरुद्ध सेमीफाइनलमध्ये Team India पराभूत पण या खेळाडूने जिंकली संगळ्यांची मनं
(Photo Credit/Getty Image)

बुधवारी, भारतीय संघाचा (Indian Team) तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न तुटले. न्यूझीलंड (New Zealand) ने भारताला 18 धावांनी पराभूत करून सलग दुसऱ्यांदा फायनलला धडक मारली आहे. पण, भारताने सामना जरी गमावला असला तरी अष्टपैलू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याने प्रत्येकाचे मन जिंकले. जडेजाने तुफानी फलंदाजी केली आणि 4 चौकार आणि 4 षटकारांसह 59 चेंडूत 77 धावा केल्या. जडेजा फलंदाजी करत असताना एक वेळी असे वाटत होती की एम एस धोनी (MS Dhoni) च्या साथीने तो भारतीय संघाला विजय मिळवून देईल पण असे काही झाले नाही. (IND vs NZ, World Cup Semi-Final 2019: न्यूझीलंड विरुद्ध सेमीफायनल मॅचमध्ये 'सर रवींद्र जडेजा' विक्रमी कामगिरीची नोंद)

दरम्यान, फलंदाजीसह जडेजाने गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात उत्कृष्ट कामगिरी केली. आजच्या सामन्यात त्याने रॉस टेलर (Ross Taylor) ला धावचीत करत पॅव्हेलियनला पाठवले. शिवाय त्याने टॉम लॅथम (Tom Latham) याचा झेल टिपला. गोलंदाजीमध्ये आज जडेजाने 10 ओव्हरमध्ये फक्त 34 धावा देत 1 गडी बाद केला. सामना संपल्यानंतर कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने जडेजाचे कौतुक केला आणि म्हणाला की जडेजाचा फॉर्म संघासाठी चांगला संकेत आहे.

दुसरीकडे, जडेजा व्यतिरिक्त धोनीने देखील महत्वाची खेळी केली. धोनीने 72 चेंडूत 50 केल्या. इतर भारतीय फलंदाज आज चांगली कामगिरी करू शकले नाहीत. रोहित शर्मा, विराट कोहली, दिनेश कार्तिक आणि के. एल. राहुल लवकरच माघारी परतले. रिषभ पंत आणि हार्दिक पंड्या यांनी भारताचा डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला पण मोठे शॉट्स खेळण्याच्या नादात आपली विकेट गमावून बसले.