Lata Mangeshkar Birthday: लता मंगेशकरांच्या स्वरसाजातील ही गाणी आजच्या दिवसाची सुरूवात करतील Nostalgic
लता मंगेशकर (Photo Credits-Twitter)

भारताची गान कोकिळा लता मंगेशकर (Lata Mangeshkar) आज 92 वा वाढदिवस साजरा करत आहे. लता मंगेशकर यांच्या दैवी आवाजाचे चाहते जगभरामध्ये पसरले आहेत. भारतात लता मंगेशकरांच्या आवाजातील एकही गाणं मंत्रमुग्ध करू शकलं नाही असा संगीतप्रेमी सापडणं विरळच आहे. अनेक गायकांसाठी लता मंगेशकरांचं गाणं हा त्यांच्या रियाझाचा एक भाग आहे तर अनेक कानसेनांसाठी लता मंगेशकरांचं गाणं हे स्ट्रेस बस्टर आहे. मग आजचा तुमचा दिवस लताबाईंच्या काही अजरामर गाण्यांनी सुरू करून त्या जुन्या काळामध्ये रमून जाण्यासाठी सज्ज व्हा.

लता मंगेशकरांनी केवळ मराठी सिनेसृष्टीपुरतं आपलं विश्व मर्यादित ठेवलं नाही. मराठी सोबतच बॉलिवूड अर्थात हिंदी, बंगाली आणि दाक्षिणात्य भाषांमध्येही गाणी रेकॉर्ड केली आहेत. नक्की वाचा: Lata Mangeshkar Birthday Special: लता मंगेशकर 'भारताची गानकोकिळा' होण्यापूर्वीच्या त्यांच्या आयुष्यातील जाणून घ्या या 5 खास गोष्टी!

गगन सदन तेजोमय

लग जा गले

मोहे पनघट पे

ए मेरे वतन के लोगो

हमको हमी से चुरालो

मेरे ख्वाबो में जो आए

नीज माझ्या नंदलाला

लता मंगेशकर या केवळ गायिका नाहीत. आनंदघन या नावाने त्यांनी संगीतकार म्हणून देखील काम केले आहे. लता मंगेशकर या मंगेशकर भावंडांमधील सर्वात मोठ्या असल्या तरीही त्यांच्या छत्रछायेमध्ये वाढलेली चारही भावंडं संगीत क्षेत्रामध्ये आपलं स्थान पक्क करून आहेत.