Kartiki Gaikwad Engagement Photos: कार्तिकी गायकवाड आणि रोनित पिसे यांचा साखरपुडा संपन्न, पहा या नव्या जोडीचे सुंदर फोटो
Kartiki Gaikwad Engagement Photos (Photo Credits: Instagram)

'सा रे ग म प- लिटिल चॅम्प्स' (Sa Re Ga Ma Pa Little Champs) या कार्यक्रमाची विजेती कार्तिकी गायकवाड (Kartiki Gaikwad) हिने आपल्या आयुष्याची एक नवी सुरुवात केली आहे. तुम्ही सर्वांनी टीव्ही वर गाताना पाहिलेली कार्तिकी आता बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहे. नुकताच 26 जुलैला तिचा साखरपुडा पार पडला असून लवकरच ती लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. रोनित पिसे (Ronit Pise) याच्या सोबत कार्तिकीचा साखरपुडा झाला असून आता तिने स्वतः आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून फोटो शेअर करत सर्वांना माहिती दिली आहे. यापूर्वी कार्तिकीच्या पाहण्याच्या कार्यक्रमाचे फोटो सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता या साखरपुडाच्या फोटोवर सुद्धा अनेकांनी कमेंट करून तिला नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. (हेही वाचा: अभिनेत्री सोनाली कुलकर्णी होणार लंडनची सून; Fiancé कुणाल बेनोडेकर सोबतचे साखरपुड्याचे फोटो केले शेअर (See Photos))

कार्तिकीचा होणारा नवरा रोनित पिसे हा मेकॅनिकल इंजिनिअर असून त्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे .रोनित हा मुळचा पुण्याचा आहे. कार्तिकीचे वडिल कल्याणजी गायकवाड यांच्या मित्रपरिवारातील हे कुटूंब आहे. कार्तिकी व रोनितचे हे अरेंज मॅरेज आहे. महत्वाचे म्हणजे रोनितला देखील संगीताची आवड आहे. त्याला उत्तम तबला वाजवता येतो. त्याने तबल्याच्या तीन परीक्षा देखील दिल्या आहेत.

कार्तिक गायकवाड च्या साखरपुड्याचे फोटो

दरम्यान, कार्तिकीचे संगीतातील करिअर 2009 साली झी मराठीच्या 'सा रे ग म प- लिटिल चॅम्प्स' द्वारे सुरु झाले होते. या नंतर कलर्स वाहिनीवरील ‘राइझिंग स्टार’ या रिअॅलिटी शो मध्येही तिला पाहायला मिळाले होते, अनेक अवार्ड शो मध्ये सुद्धा लिटिल चॅम्प्स च्या अंतिम फेरीतील आर्या आंबेकर, मुग्धा वैशंपायन, प्रथमेश लघाटे, रोहित राऊत आणि कार्तिकी गायकवाड ही टीम दिसून आली होती. कार्तिकीने झी च्या गजर कीर्तनाचा’ या कार्यक्रमाचे निवेदनही केले आहे.