![](https://mrst1.latestly.com/uploads/images/2025/02/iifa-awards-2025-380x214-1-.avif?width=380&height=214)
IIFA Awards 2025: आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट अकादमी पुरस्कार (आयफा) 8 आणि 9 मार्च रोजी जयपूर येथे होणार आहे. या पुरस्कार सोहळ्यात गेल्या वर्षभरात भारतीय चित्रपटसृष्टीत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट कलाकारांचा हा पुरस्कार दिला जातो. मंत्रमुग्ध करणारे सादरीकरण, उत्साह आणि अविस्मरणीय क्षणांनी भरलेला हा आगामी कार्यक्रम भव्य दिव्य असणार आहे. बॉलिवूडचा सर्वात प्रतिष्ठेचा पुरस्कार सोहळा, आयफा अवॉर्ड्स 2025 यावर्षी राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये होणार आहे. हा २५ वा पुरस्कार सोहळा रौप्यमहोत्सवसाजरा करत असून हा सोहळा दोन दिवस चालणार आहे. दोन दिवसांचे नेत्रदीपक सादरीकरण या पुरस्कार सोहळ्यात होणार आहे. यावेळी, आयफा डिजिटल पुरस्कार देखील सादर केले जात आहेत, जे डिजिटल मनोरंजन, चित्रपट आणि ओटीटीमध्ये प्रदर्शित झालेले चित्रपट आणि त्यात उत्कृष्ट काम केलेल्या कलाकारांचा सन्मान करण्यात येणार आहे.
शाहरुख खान, माधुरी दीक्षित, शाहिद कपूर आणि करिना कपूर खान ग्रँड फिनालेमध्ये आपल्या शानदार नृत्य आणि अभिनयाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतील. दरम्यान, नोरा फतेही आयफा डिजिटल अवॉर्ड्समध्ये आपल्या अप्रतिम डान्समूव्ह्सने रंगमंचावर आग लावण्यास सज्ज झाली आहे. जयपूरमध्ये पहिल्यांदाच होत असलेल्या या सोहळ्याबद्दल चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.
आयफा पुरस्कार 2025 कधी आणि कुठे होणार आहे?
आयफा पुरस्कार 2025 8 आणि 9 मार्च रोजी जयपूर एक्झिबिशन अँड कन्व्हेन्शन सेंटर मध्ये होणार आहे. या भव्य सोहळ्याअंतर्गत ८ मार्च रोजी आयफा डिजिटल पुरस्कार आणि ९ मार्च रोजी आयफा ग्रँड फिनाले आणि मुख्य पुरस्कार सोहळा होणार आहे. ओटीटी आणि डिजिटल कंटेंटला मान्यता देणाऱ्या डिजिटल पुरस्कारांची यंदा पहिलीच सुरुवात होणार आहे.
स्टेज परफॉर्मन्स आयफा २०२५ चे सूत्रसंचालन यावेळी करण जोहर आणि कार्तिक आर्यन करणार आहेत, तर अपारशक्ती खुराना आयफा डिजिटल पुरस्कारांची जबाबदारी सांभाळणार आहे.
आयफा पुरस्कार 2025 ची तिकिटे कशी बुक करावीत?
आयफा २०२५ ची तिकिटे झोमॅटोवर ऑनलाइन उपलब्ध आहेत.
सर्वात स्वस्त तिकीट: 3,000 ऑरेंज ब्लॉक ए आणि बी- यात सामान्य आसनासह प्रवेश मिळणार आहे.
![(Photo Credits: Website/district.in)](https://mrst1.latestly.com/uploads/images/2025/02/iifa-awards-2025-tickets.png?width=1000&height=565)
प्रीमियम अर्ली बर्ड तिकीट: 1,50,000 - ललित जयपूरमध्ये दोन रात्रीचा मुक्काम, सेलिब्रिटी वेलकम व्हिडिओ, आयफा मर्चेंडाइज आणि डेली एफ अँड बी व्हाउचर्स सह अनेक विशेष फायदे समाविष्ट आहेत.
सुवर्ण श्रेणीची तिकिटे: केवळ निमंत्रित, म्हणजे केवळ निवडक पाहुण्यांसाठी असणार आहे.