WWE स्टार John Cena अडकला विवाहबंधनात; जाणून घ्या पत्नी Shay Shariatzadeh बद्दल काही खास गोष्टी
John Cena and Shay Shariatzadeh (Photo Credits: Instagram)

16 वेळा वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेंट चॅम्पियन (WWE) आणि हॉलिवूड स्टार जॉन सीनाने (John Cena) अखेर लग्न केले आहे. बुधवारी रात्री जॉन सीनाने फ्लोरिडाच्या टांपा येथे एका सोहळ्यात आपली 31 वर्षीय गर्लफ्रेंड Shay Shariatzadeh बरोबर लग्न केले. या सोहळ्यास बरेच फिल्मस्टार्स, डब्ल्यूडब्ल्यूई सेलिब्रिटीज उपस्थित होते. मार्च 2019 पासून जॉन सीना आणि Shariatzadeh यांचे प्रेमसंबंध आहेत आणि 2020 च्या सुरुवातीच्या काळात या जोडप्यात साखरपुडा केला होता. रिपोर्ट्सनुसार, 12 ऑक्टोबर रोजी जॉन सीना लग्न बंधनात अडकला.

जॉन सीनाने त्याच्या खाजगी आयुष्याबाबत कमी गोष्टी चाहत्यांशी शेअर केल्या आहेत. प्रोसेस रीसेलिंगच्या जगात अगदी कमी लोक Shay Shariatzadeh  बद्दल जाणतात. जॉन सीना हे WWE मधील फार मोठे नाव आहे. वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेंटच्या क्षेत्रात जवळपास दोन दशके व्यतीत केलेल्या जॉन सीनाची जागतिक पातळीवर मोठी लोकप्रियता आहे. गेल्या काही वर्षांपासून WWE सोबतच त्याने हॉलिवूडमध्ये आपले स्थान बनवले आहे. Blockers आणि Bumblebee सारख्या चित्रपटांमध्ये त्याने अभिनय केला आहे, मात्र फास्ट आणि फ्यूरियस (Fast and Furious) मधून त्याला खूप लोकप्रियता मिळाली. तो आगामी फास्ट अँड फ्यूरियस 9 आणि द सुसाइड स्क्वॉडमध्ये देखील काम करणार आहे.

तर, 2019 मध्ये जॉन सीना आणि Shay Shariatzadeh हे 'डुलिटिल' चित्रपटाच्या प्रीमियरवेळी डब्ल्यूडब्ल्यूई सुपरस्टार बेकी लिंच आणि सैथ रॉलिनसमवेत दिसले होते. Shay Shariatzadeh एक अभियंता असून तिने ब्रिटीश कोलंबिया विद्यापीठातून इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे. शेच्या लिंकडीन प्रोफाइलवरून असे दिसून येते की, ती सध्या Sonatype मध्ये प्रॉडक्ट मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. या अगोदर, ती Motorola Solutions मध्येही प्रॉडक्ट मॅनेजर राहिली आहे. त्याआधी 2014-15 मध्ये अल्फा टेक्नॉलॉजीजसाठी ती अॅप्लीकेशन इंजीनियर होती. (हेही वाचा: XXX माजी पॉर्नस्टार मिया खलिफा ने केले गुपचूप लग्न? सोशल मिडियावरील तिची 'ही' पोस्ट पाहून चाहतेही संभ्रमात)

16-वेळा चॅम्पियन असण्याव्यतिरिक्त, जॉन सीना पाच वेळा डब्ल्यूडब्ल्यूई युनायटेड स्टेट्स चॅम्पियन आणि चार वेळा डब्ल्यूडब्ल्यूई टॅग टीम चॅम्पियन देखील आहे. सीना 14 जानेवारीपासून डब्ल्यूडब्ल्यूई मध्ये कुस्ती खेळलेला नाही. एका मुलाखतीत शे म्हणाली होती की, व्हॅनकुव्हरमध्ये राहत असताना तिने जॉनला पाहिले होते. तेव्हा ती कॅनडाच्या व्हँकुव्हरमधील मोटोरोला सोल्यूशन कंपनी अ‍ॅविग्नॉन येथे प्रॉडक्ट मॅनेजर होती. यावेळी तिने जॉनची मुलाखत घेतली, तेव्हापासून जॉन तिच्या संपर्कात आहे.