Tito Jackson Passed Away: दिवंगत पॉप गायक मायकल जॅक्सन (Michael Jackson) चा भाऊ गायक टिटो जॅक्सन (Tito Jackson) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 70 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. टिटोच्या मृत्यूच्या वृत्ताची पुष्टी स्टीव्ह मॅनिंग यांनी केली, जो जॅक्सन कुटुंबाचा दीर्घकाळचा मित्र आणि सहकारी होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, स्टीव्ह मॅनिंग यांनी दावा केला आहे की, गाडी चालवत असताना टिटोला हृदयविकाराचा झटका आला. मात्र, मृत्यूचे कारण अद्याप अधिकृतपणे समोर आलेले नाही.
अलीकडेच त्याने त्याचा भाऊ मार्लोन आणि जॅकीसह इंग्लंडमध्ये परफॉर्म केले होते. अलिकडच्या वर्षांत त्याने ब्लूज गिटार वादक म्हणून अनेक रेकॉर्डिंग आणि शो देखील केले. टिटो जॅक्सन गिटार वाजवणे, गाणे आणि नृत्य करण्यात निपुण होते. (हेही वाचा -Mangey Khan Passed Away: राजस्थानी गायक मांगे खान यांचे निधन; कोक स्टुडिओमुळे मिळाली होती ओळख)
टिटो 'जॅक्सन 5' चा देखील सदस्य होते. 'जॅक्सन 5' हा 60 च्या दशकाच्या उत्तरार्धात आणि 70 च्या दशकाच्या सुरुवातीस आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय बँड बनला होता. मायकलचे 25 जून 2009 रोजी वयाच्या 50 व्या वर्षी निधन झाले होते. (हेही वाचा - Dilli Babu Passed Away: साऊथ इंडस्ट्रीवर शोककळा! चित्रपट दिग्दर्शक दिल्ली बाबू यांचे निधन; चेन्नईत होणार अंत्यसंस्कार)
My condolences to the family ...its a very sad day,...sad time...#Tito was a kind man.
Rest In Peace #TITOJACKSON... we will MISS YOU 🙏
My heart is with Mother Katherine and the #JacksonFamily. 🙏 pic.twitter.com/XPOY6NbF1p
— ᴹ♚ᴶ SKY JACKSON ᴹ♚ᴶ (@__SkyJackson__) September 16, 2024
दरम्यान, टिटोने आपल्या टॅलेंटने चाहत्यांच्या मनात खास स्थान निर्माण केले होते. टिटो यांनी तीन मुलं आहेत. वडिल टिटो यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलांनी सोशल मीडियावर गायकाच्या निधनाची बातमी शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं आहे की, 'जड अंतःकरणाने, आम्ही घोषणा करतो की आमचे प्रिय वडील, रॉक अँड रोल हॉल ऑफ फेमर टिटो जॅक्सन, आता आमच्यासोबत नाहीत. आमचे वडील एक अविश्वसनीय व्यक्ती होते ज्यांना प्रत्येकाच्या कल्याणाची काळजी होती.'