Oscars 2019 Live Streaming: भारतामध्ये  91 वे  Academy Awards लाईव्ह कसे, कुठे, कधी पहाल?
Oscars 2019 (Photo Credits: Wikimedia Commons)

Oscars Awards 2019: 'द अॅकेडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्स'ने (The Academy of Motion Picture Arts and Sciences) यंदा ऑस्कर अवॉर्ड्स 2019 चे आयोजन 24 फेब्रुवारीला केले आहे. या पुरस्कार सोहळ्यात जगभरातील उत्तम सिनेमांचा सन्मान करण्यात येतो. तुम्ही या ग्रँड पुरस्कार सोहळा ऑस्करच्या अधिकृत वेबसाईट oscar.go.com वर लाईव्ह पाहु शकाल. ऑस्कर 2019 पुरस्कारांची नामांकने, ‘रोमा’ आणि ‘द फेव्हरिट’ आघाडीवर

तसंच भारतीय चाहते हॉटस्टार (Hotstar) या अॅपवर देखील या पुरस्कार सोहळ्याचा आनंद लुटू शकतात. हॉटस्टार वर हा सोहळा पाहण्यासाठी येथे क्लिक करा. त्याचबरोबर स्टार मुव्हीज चॅनल (Star Movies Channel)वर चाहते हा ग्रँड पुरस्कार सोहळा पाहू शकतात.

भारतात हा पुरस्कार सोहळा सकाळी 5:30 नंतर वाजता प्रसारित केला जाईल आणि त्यानंतर पुरस्कार वितरण सोहळा रंगेल. या इव्हेंटमध्ये डान्स आणि संगीताचा देखील तडका लावला जाईल. मीडिया रिपोर्ट्स नुसार, या पुरस्कार सोहळा 30 वर्षात पहिल्यांदाच कोणत्याही होस्ट शिवाय पार पडेल.

ऑस्कर अवॉर्ड्स जगभरातील 225 देशात लाईव्ह दाखवला जाईल, अशी माहिती ऑस्करच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन देण्यात आली आहे.

या पुरस्कार सोहळ्यात सिनेमेटोग्राफी, एडिटिंग, लाईव्ह अॅक्शन, मेकअप अँड हेअरस्टायलिंग यांसारख्या कॅटेगरीत पुरस्कार प्रदान करण्यात येतील.