वृत्तपत्राने प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री Julia Roberts हिच्या नावाच्या शीर्षकात घातला घोळ, मागितली माफी
ज्युलिया रॉबर्टस् (फोटो सौजन्य-ट्विटर)

New York येथील एका स्थानिक वृत्तपत्राने प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्रीच्या नावाच्या शीर्षकात घोळ घातल्याने त्यांना तिची माफी मागावी लागली आहे. तसेच घोळ घातल्या गेलेल्या वृत्ताचे शीर्षक तेथील नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.

जेम्सटाऊन(Jamestown) च्या 'द पोस्ट जर्नल' या वृत्तपत्रात हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री ज्युलिया रॉबर्टस्( Julia Roberts) हिच्या आयुष्याबद्दल एक लेख छापून आला होता. तसेच वृत्तपत्रात तिच्या आयुष्यावरील कथा फारच सुंदर पद्धतीने मांडली होती. मात्र ज्युलियाच्या लेखाचे शीर्षक पाहूनच तेथील नागरिकांनी वृत्तपत्रावर टीका करण्यास सुरुवात केली. या लेखाच्या शीर्षकामध्ये 'Juila Roberts Finds Life And Her Holes Get Better with Age' असे चुकीच्या पद्धतीने छापले होते. मात्र वृत्तपत्रात ज्युलिया बद्दलच्या लेखाच्या शीर्षकात Roles ऐवजी Holes लिहिले गेले. वृत्तपत्रासाठी ही चुक किती लाजीरवाणी असल्याचे नेटकऱ्यांनी म्हटले आहे.

या प्रकरणी 'द पोस्ट जर्नल' या वृत्तपत्राने दुसऱ्या दिवशीच्या वृत्तपत्रात ज्युलियाच्या शीर्षकावरुन झालेल्या घोळ प्रकरणी माफी मागितली. आहे.