मालिकांसोबतच रिअॅलिटी शोदेखील भारतीय छोट्या पडद्याचा अविभाज्य घटक आहेत. वर्षानवर्षे चालणाऱ्या रटाळ मालिका सोडून सध्याच्या सुजाण प्रेक्षक रिअॅलिटी शोला प्राधान्य देताना दिसून येत आहे. त्यातही तब्बल 11 वर्षे छोट्या पडद्यावर अधिराज्य गाजवणाऱ्या बिग बॉसचे चाहते अगणित आहेत. प्रत्येक वर्षी बिग बॉसची घोषणा झाल्यापासून ते बिग बॉसचा सिझन संपेपर्यंत भारतामध्ये राजकारण, चित्रपट आणि क्रिकेटसोबत चर्चा असते ती बिग बॉसची.
बिग बॉस पाहताना प्रेक्षकांच्या मनात अनके प्रश्न निर्माण होतात, हा खरच ‘रिअॅलिटी शो’ असेल का? एकाच छताखाली इतके सगळे सेलिब्रिटी कसे काय राहू शकतात? या सेलिब्रिटींना अनेक गोष्टीत सूट मिळत असले इत्यादी. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला बिग बॉसच्या घराबद्दल असे 10 सिक्रेट्स सांगणार आहोत जे एकून तुम्हालाही धक्का बसेल.
बिग बॉसची माजी स्पर्धक नितिभा कौल हिने एक व्हिडिओ युट्यूबवर शेअर केला आहे. या व्हिडिओद्वारे तिने बिग बॉसच्या घरातील 10 सिक्रेट्स म्हणजेच 10 अशा गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या फक्त बिग बॉसच्या घरात राहिलेल्या स्पर्धकांनाच माहित आहेत.
1) वीकएंडला बिग बॉसच्या घरात स्पर्धक जेवण बनवत नाहीत – होय, वीकएंडला बिग बॉसच्या घरात जेवण येते सलमान खानच्या घरातून, तेही स्वतः सलमान खानच्या कूकने बनवलेले. त्यामुळे वीकएंडला स्पर्धक घरात जेवण बनवत नाहीत. एके दिवशी सलमानच्या घरातून आलेलं जेवण मिळालं नाही, तेव्हा त्याने शूटिंग अर्ध्यावरच थांबवून बिग बॉसच्या प्रॉडक्शन टीमची कानउघडणी केली होती.
2) घरात दारू मिळत नाही – खूप लोकांना असे वाटत असेल की, सेलिब्रिटी घरात राहत आहे म्हणजे घरात त्यांना दारू मिळत असेल. मात्र हा समज चुकीचा आहे. बिग बॉसच्या घरात दारू मिळत नाही. सिगारेट्स पिण्यास या घरात परवानगी आहे. बिग बॉसकडून या सिगारेट्सचा पुरवठा करण्यात येतो. घरात प्रवेश करण्यापूर्वी स्पर्धकांच्या सर्व वस्तूंची कसून तपासणी होते.
3) घर मध्येच सोडू शकत नाही – कोणत्याही कारणास्तव तुम्हाला जर का बिग बॉसचे घर सोडायचे असेल, तर तुम्हाला तब्बल 2 करोड रुपयांचा दंड भरावा लागेल. हा नियम केल्या जाणाऱ्या करारपत्रातही लिहिलेला असतो.
4) सेटवर असतात क्रू मेंबर्स – जर तुम्ही हा शो अतिशय निरीक्षणपूर्वक बघत असाल तर तुमच्या लक्षात येईल, घराची बाहेरील संपूर्ण भिंत ही काचेची बनलेली आहे. काचेच्या बाहेरून क्रू मेंबर्स सतत स्पर्धकांवर नजर ठेवत असतात.
5) आधी कोणालाही कोणाचीही ओळख नसते – प्रिमियरपर्यंत कोणता स्पर्धक बिग बॉसच्या घरात पाय ठेवणार आहे हे लोकांना समजू नये म्हणून, स्पर्धकांना हॉटेलवरून सेटवर घेऊन येताना त्यांच्या चेहऱ्यावर मास्क लावला जातो, डोळ्यांवर पट्टी बांधली जाते.
6) वेळ समजत नाही – बिग बॉसच्या घरात स्पर्धकांना वेळेचा कोणताही अंदाज नसतो. टीव्हीवर स्पर्धक सकाळी 8 ला उठत आहेत हे दाखवत असले तरी, स्पर्धकांची उठण्याची वेळ ही आधीच्या दिवसाचे शुटींग कधी संपले आहे त्याच्यावर अवलंबून असते. म्हणजे आदल्या दिवशी शूटिंग उशिरा संपल्यास, दुसऱ्या दिवशी सकाळी स्पर्धकांना उशिरा उठवले जाते.
7) घरात घेऊन जाणाऱ्या वस्तूंवर बंधने – सामील होणाऱ्या स्पर्धकाची प्रत्येक गोष्ट बिग बॉसच्या क्रू मेंबर्सकडून तपासली जाते. कोणत्याही ब्रँडचा उल्लेख कपड्यांवर असल्यास ते कपडे शोमध्ये वापरता येत नाहीत. गॉगल, कॅप, घड्याळ, चेक्स शर्ट अशा गोष्टीदेखील स्पर्धक घरात घेऊन जाऊ शकत नाहीत.
8) ऑफ डे – शनिवार हा बिग बॉसच्या घरातील ऑफ डे म्हणजे सुट्टीचा दिवस असतो. सहसा या दिवशी घडलेल्या गोष्टी आपल्याला टीव्हीवर दाखवल्या जात नाहीत. यादिवशी जर एखादे मोठे भांडण किंवा वाद झाला तर तो रविवार किंवा सोमवारच्या भागात दाखवला जातो.
9) घराची स्वच्छता – घराची स्वच्छता स्पर्धक करत असतील हा आपला समज असतो, मात्र हे चुकीचे आहे. स्पर्धक रात्री झोपल्यावर सफाई कामगार येऊन बिग बॉसच्या घराची स्वच्छता करून जातात.
10) विशेष विनंती – बिग बॉसच्या घरात स्पर्धकांना फक्त दोनच बॅग घेऊन जाण्याची परवानगी असते. मात्र जर का त्यांना काही हवे असेल किंवा एखाद्या गोष्टीची गरज असेल ती स्पर्धकांच्या कुटुंबाला विनंती करून ती मागवून घेता येऊ शकते.