harish magan passed away (Photo credit- twitter)

 Harish Magon Death:  ज्येष्ठ अभिनेता हरिश मॅगन यांच वयाच्या 76 व्या वर्षी निधन झाल्याचे समोर आले आहे. हिंदू चित्रपट सुष्टीत हरिश मॅगन यांच मोठं योगदान होत. अनेक चित्रपटातून त्यांनी प्रेक्षकांच मनोरंजन केले. गोलमाल, नमक हलाल आणि इंकार या सारख्या चित्रपटातून आपली भुमिका पार पाडली. अनेक वर्ष त्यांनी हिंदू चित्रपटसुष्टीत त्यांनी काम केल, त्यांच्या मृत्यूचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही. हरिश मॅगन यांच्या निधनानंतर हिंदी चित्रपटसुष्टीत शोककळा पसरली आहे.

सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनने (CINTAA) हरीश मॅगन यांच्या निधनाची बातमी ट्विटरवर शेअर केली. अनेक कलाकारांनी आणि चाहत्यांनी त्यांना आंदरांजली वाहीली आहे.  (CINTAA) पोस्ट मध्ये त्यांनी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करते.  1988 पासून ते ह्या संघटनेचे सदस्य असल्याचे सांगितले आहे.

हरीश मॅगन  यांनी एफटीआयआयमधून शिक्षण घेतले. ‘चुपके चुपके’, ‘खुशबू’, ‘मुकद्दर का सिकंदर’ आणि ‘शहेनशाह’ यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केले. ‘उफ़! ये मोहब्बत’ हा 1997 मध्ये आलेला त्यांचा अखेरचा चित्रपट होता.  काही कारणांमुळे त्यांनी अभिनय करताना दिसले नाही. पण ते मुंबईतील जुहू इथं हरीश मॅगन अॅक्टिंग इन्स्टिट्यूट चालवायचे.