प्रसिद्ध कव्वाली गायक फारीद साबरी (Farid Sabri) यांचे निधन झाले आहेत. साबरी ब्रदर्स म्हणून ओळख असलेल्या या जोडगोळीतील फारीद साबरी यांनी बुधवार (21 एप्रिल) दिवशी जगाचा निरोप घेता आहे. ते 58 वर्षांचे होते. फारीद साबरी यांचे भाऊ अमिन साबरी यांनी एबीपी न्यूजला दिलेल्या माहितीनुसार, फारीद साबरी यांना न्यूमोनियाचा त्रास जडला होता. त्यानंतर त्यांना हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र मंगळवार पासूनच त्यांची प्रकृती खालावत होती आणि अखेर बुधवारी त्यांची प्राणज्योत मालवली. नक्की वाचा: Music Composer Shravan Rathod Passed Away: संगीतकार श्रवण राठोड यांचे निधन, काही दिवसांपूर्वी झाली होती कोरोनाची लागण.
सईद साबरी यांचे पुत्र फारीद साबरी. त्यांनी बॉलिवूडमध्ये अनेक प्रसिद्ध कव्वाली दिल्या आहेत. 'हिना' सिनेमामधील लता मंगेशकर यांच्यासोबत फारीद साबरी यांनी गायलेलं ' देर ना हो जाए कही...' हे गाणं विशेष गाजलं. भाऊ आमिन साबरी सोबतही त्यांनी विशेष गाणी गायली अअहे. मराठी मध्ये संगीतकार अवधूत गुप्ते यांच्या 'मोरया' सिनेमामध्ये ' हे लंबोदर गजमुख...' ही गणपती वरील कव्वाली देखील फारिद साबरी यांनी गायली आहे. यामध्ये त्यांच्यासोबत स्वप्निल बांदोडकर आणि जान्हवी प्रभू अरोरा यांचा आवाज होता. तर अभिनेता सुबोध भावे याच्यावर ते चित्रित झालं आहे.
राजस्थान मध्ये जयपूरमधील हॉस्पिटल मध्ये ते उपचार घेत होते. पण त्यांच्यावरील अंत्यविधी मथुरा वालों की हवेली या त्यांच्या पूर्वजांच्या गावामध्ये करण्यात आले आहे. साबरी कुटुंबाकडून यावेळी चाहत्यांना अनावश्यक गर्दी न करण्याचं आवाहन करण्यात आले होते.