Music Composer Shravan Rathod Passed Away: संगीतकार श्रवण राठोड यांचे निधन, काही दिवसांपूर्वी झाली होती कोरोनाची लागण
Shravan Rathod (Photo Credits: Twitter)

बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध संगीतकारांच्या जोडीपैकी एक नदीम-श्रवण यांची जोडी आता तुटली आहे. कारण या जोडीतील श्रवण राठोड (Shravan Rathod) यांचे आज मुंबईत निधन झाले. त्यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांची कोरोनाशी झुंज अपयशी ठरली असून वयाच्या 66 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने हिंदी संगीत जगतात शोककळा पसरली आहे. नदीम-श्रवण या जोडीने 90 च्या दशकात अनेक हिट्स गाणी दिली होती. मुंबईच्या रहेजा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होती. मात्र आता त्यांची निधनाची बातमी समोर येत आहे.

संगीतकार नदीम सैफी यांनी बॉम्बे टाईम्सशी बोलताना सांगितले की, "माझा शानू आता या जगात नाही. आम्ही पूर्ण आयुष्य एकत्र पाहिले. आम्ही आमच्या आयुष्यात खूप यश तसेच बरेच चढ-उतार पाहिले. थोडक्यात आम्ही अनेक बाबतीत एकमेकांसोबत वाढलो. मला सांगण्यात अत्यंत दु:ख होत आहे, माझी साथ, माझा दोस्त आता या जगात राहिला नाही. मी त्याच्या मुलाशी बोललो. आम्ही मागील काही दिवसांपासून सातत्याने एकमेकांच्या संपर्कात होतो. जेव्हा त्याची तब्येत बिघडली आणि त्याला रुग्णालयात दाखल केले. तेव्हा देखील आमचा संपर्क होता."हेदेखील वाचा- Actor Kishore Nandlaskar Passes Away: अभिनेता किशोर नांदलस्कर यांचे निधन

रिपोर्टनुसार, श्रवण राठोड यांचे दु:खद निधन झाले असून कोरोनाशी त्यांची झुंज अपयशी ठरली आहे. तथापि ते अन्य आजारांनी ग्रस्त होते. ज्यामुळे त्यांच्या उपचारादरम्यान अनेक अडचणी येत होत्या. 22 एप्रिलला त्यांची तब्येत जास्त बिघडली.

नदीम-श्रवण या जोडीने बॉलिवूडमध्ये आशिकी, साजन आणि सडक सारख्या हिट चित्रपटांना सुपरहिट्स म्यूजिक दिले आहे. यातील गाण्यांमुळे हे चित्रपट सुपरहिट झाले होते.