Ecuadorian Beauty Queen Shot Dead: इक्वेडोरच्या ब्युटी क्वीनची गोळ्या झाडून हत्या; इंस्टाग्राम पोस्टमुळे उघड झाले मारेकऱ्यांचे ठिकाण
Landy Párraga Goyburo (PC - Instagram)

Landy Párraga Goyburo Shot Dead: फॅशन जगतातून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहेत. माजी मिस इक्वाडोर स्पर्धक लँडी पॅरागा गोयबुरो (Landy Párraga Goyburo) हिची भरदिवसा गोळ्या घालून हत्या (Murder) करण्यात आली आहे. सोशल मीडियावर लँडीचे एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे, ज्यामध्ये ती लॉस रिओस प्रांतातील शहरातील एका रेस्टॉरंटमध्ये दिसत होती. त्यानंतर अचानक काही सशस्त्र लोक आले आणि त्यांनी लेंडीवर गोळ्या झाडल्या. गोळी लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. ही बातमी येताच फॅशन जगतात दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

रिपोर्टनुसार, स्थानिक मीडिया आउटलेट इक्वाविसा यांनी वृत्त दिले आहे की, लँडी पररागा गोयबुरो एका दिवसापूर्वी एका लग्नात सहभागी होण्यासाठी आली होती. दुसऱ्या दिवशी तिला गोळ्या घालण्यात आल्या. या हल्ल्यामागचा हेतू काय होता हे अद्याप समोर आलेले नाही. सध्या पोलिसांनी आरोपींची ओळख पटवून त्यांना अटक करण्यासाठी तपास सुरू केला आहे. (हेही वाचा - Joe Flaherty Passed Away: कॉमेडियन जो फ्लाहर्टी यांचे वयाच्या 82 व्या वर्षी निधन, कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली)

23 वर्षांच्या तरुण वयात, लेंडी पररागा गोयबुरो माजी ब्युटी क्वीन म्हणून प्रसिद्धीझोतात आली होती. सोशल मीडियावर तिचे दहा लाखांहून अधिक फॉलोअर्स होते. याशिवाय लँडीने स्वतःची स्पोर्ट्सवेअर लाइनही चालवली. तिच्या आकस्मिक निधनाने मॉडेलच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सध्या पोलीस या हल्ल्यामागील कुख्यात टोळी आणि तिच्या म्होरक्याचा शोध घेण्यात व्यस्त आहेत.