दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांची कन्या स्वानंदी बेर्डे शेअर केले 'धनंजय माने इथेच राहतात' या आपल्या पहिल्या नाटकाचे शीर्षक गीत, Watch Video
Dhananjay Mane Ithech Rahtat (Photo Credits: Instagram)

मराठी सिनेसृष्टीतील दिवंगत विनोदी कलाकार लक्ष्मीकांत बेर्डे यांची कन्या स्वानंदी बेर्डे (Swanandi Berde) लवकरच रंगभूमीवरून अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे. 'धनंजय माने इथेच राहतात' (Dhananjay Mane Ithech Rahtat) या नाटकातून ती लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नाटकामध्ये तिची आई प्रिया बेर्डे देखील असणार आहे. या नाटकाचे भन्नाट शिर्षक गीत (Title Track) नुकतेच स्वानंदीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहे. या नाटकामध्ये स्वानंदी सौ. मानेंच्या भूमिकेत दिसणार आहे. धनंजय माने इथेच राहतात का हा डायलॉग तिच्याच वडिलांच्या 'अशी ही बनवाबनवी' या चित्रपटातील आहे. जो आजतागायत लोक विसरलेले नाही. आता त्याच डायलॉगचे नाटक त्यांची मुलगी स्वानंदी प्रेक्षकांसमोर घेऊन येत आहे.

स्वानंदीने 'धनंजय माने इथेच राहतात' हे शिर्षक गीत शेअर करुन 'नक्की रिल्स बनवा आणि आम्हाला टॅग करायला विसरू नका' असे तिने या पोस्टला कॅप्शन दिले आहे.हेदेखील वाचा- ‘धनंजय माने इथेच राहतात’; लक्ष्मीकांत बेर्डे यांची लेक स्वानंदी मराठी रंगभूमी वर पदार्पण करण्यासाठी सज्ज!

 

View this post on Instagram

 

A post shared by Swanandi L Berde (@swanandiberde)

काही दिवसांपूर्वी स्वानंदीने तिच्या या पहिल्या नाटकाची बातमी सोशल मिडियाद्वारे आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली होती. स्वानंदी बेर्डेसह या नाटकात चैतन्या सरदेशपांडे, मृगा बोडस, प्रिया बेर्डे, चेतन चावडा आणि प्रभाकर मोरे दिसणार आहेत. येत्या 19 मार्चला या नाटकाचा पहिला प्रयोग होणार आहे. हा प्रयोग पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात संध्याकाळी 5.30 वाजता होणार आहे.

धनंजय माने इथेच राहतात या नाटकाचे दिग्दर्शन राजेश देशपांडे यांनी केले असून नितीन चव्हाण हे या नाटकाचे लेखक आहेत. या नाटकाचे निर्माते अमर गवळी, सायली गवळी आणि स्वानंदीची आई प्रिया बेर्डे देखील आहेत.