नटसम्राट ही शोकांतिका प्रथम नाटक, त्यानंतर सिनेमा आणि आता पुन्हा नाटकाच्या स्वरूपात लोकांसमोर येणार सज्ज झाली आहे. एकदंत निर्मित 'नटसम्राट' येत्या दिवाळीमध्ये झी मराठी पुन्हा रसिकांच्या भेटीला येणार आहे. श्रीराम लागू, दत्ता भट, सतिष दुभाषी, नाना पाटेकर यांनी नटसम्राटमधील अप्पा बेलवलकरांची प्रमुख भूमिका साकारली आहे. नव्या कलाकारांच्या संचात रंगमंचावर येणार्या 'नटसम्राट'मध्ये अप्पा बेलवलकरही भूमिका मोहन जोशी साकारणार आहेत.
हृषिकेश जोशी करणार दिग्दर्शन
वि.वा शिरवाडकर लिखित नटसम्राट ही कलाकृती हृषिकेश जोशी दिग्दर्शित करणार आहे. मोहन जोशींसोबत, रोहिणी हट्टंगडी, सुशील इनामदार, भक्ती देसाई, शुभांकर तावडे, अभिजीत झुंझारराव आदी कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.
गेल्या काही दिवसांपासून नटसम्राट नाटकाची तालीम सुरू असल्याची चर्चा होती. आता अखेर झी मराठी या नाटकाची घोषणा करण्यात आली आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर हे नाटक रसिकांच्या भेटीला येणार आहे. आज दसर्याच्या दिवशी झी मराठीने 'आरण्यक'च्या प्रयोगांना सुरूवात केली आहे. सोबतच 'हॅम्लेट' आणि 'अलबत्या गलबत्या' या नाटकांनाही महाराष्ट्रभरात तुफान प्रतिसाद मिळत आहे.