अलबत्या गलबत्या आणि हॅम्लेटच्या यशानंतर झी मराठी आरण्यक नाटकाची निर्मिती करणार आहे. रत्नाकर मतकरी ह्यांनी लिहिलेलं हे नाटक झी अद्वैत थिएटरच्या साहाय्याने पुन्हा रंगभूमीवर आणत आहे. येत्या विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर म्हणजेच १८ ऑक्टोबरला आरण्यक हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
जेष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, प्रतिभा मतकरी, नकुल घाणेकर, रवी पटवर्धन, विक्रम गायकवाड आणि अतुल महाजन हे ह्या नाटकात प्रमुख भूमिकेत असून रत्नाकर मतकरीचंच दिग्दर्शन आहे. कौशल इनामदार हे ह्या नाटकाला संगीत देत आहेत. विशेष म्हणजे तब्बल ४४ वर्षाने हे नाटक रंगभूमीवर येत आहे.
मराठी रंगभूमीवरची अजरामर शोकांतिका ‘नटसम्राट’ पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला?
आरण्यक हे नाटक महाभारतावर बेतलेलं असून जुन्या नाटकात सुद्धा दिलीप प्रभावळकर आणि रवी पटवर्धन हे प्रमुख भूमिकेत होते. नवीन नाटकातसुद्धा ह्यांचीच प्रमुख भूमिका आहे. अद्वैत थिएटरच्या राहुल भंडारे ह्यांनी नाटकाची निर्मिती केली असून प्रस्तुती झी मराठीची आहे.