मुंबईतील नाट्यगृहात जॅमर लावण्याच्या निर्णयाला महापालिकेकडून मंजूरी
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-File Image)

मुंबईतील नाट्यगृहात आता लवकरच जॅमर बसवले जाणार आहेत. कारण नाटक पाहायला येणारी बहुतांश मंडळी खरोखर ते पाहतात. त्यावेळी काहीजण असे येतात की त्यांच्यामुळे नाटक बघणे तर दूर त्यांच्याकडेच सारखेच लक्ष जाते. तसेच काहीजण नाटक बघताना फोनवर बोलल्यामुळे बाजूला बसणाऱ्या प्रेक्षकांना त्याचा त्रास होते. मात्र आता नाटकाच्या सभागृहात जॅमर लावण्यात येणार असल्याने फोनवर बोलता येणार नाही आहे. या निर्णयाला मुंबई महापालिकेकडून मान्यता देण्यात आली आहे.

नाटकादरम्यान मोबाईल वाजल्याने अनेकांचे लक्ष नाटकाकडे न लागता व्यक्तीच्या फोनकडे लागते. यामुळे नाटक पाहण्याचा रसभंग होतो. याच गोष्टीला आळा घालण्यासाठी आता जॅमर बसवण्यात येणार आहे. यामुळे नाटका दरम्यान फोन वाजण्याचा प्रसंगच येणार नसून प्रेक्षकांना नाटकाचा आनंद घेता येणार आहे. तर जॅमर लावण्यासाठी शिवसेना नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी महापालिकेच्या सभागृहात हा प्रस्ताव मांडला होता. हा प्रस्ताव महापालिकेकडून आता मंजूर करण्यात आला आहे.(दिग्दर्शक विजू माने यांच्यासोबत घडला 'हा' जीवघेणा प्रसंग)

 जॅमरच्या या निर्णयाचे नाट्य निर्माते आणि कलाकारांनी स्वागत केले आहे. यापूर्वी नाटक सुरु असताना मोबाईल वाजण्यावरुन कलाकार सुभोष भावे आणि सुमित राघवन यांच्यासह अन्य जणांनी सुद्धा या प्रकाराच्या विरोधात सोशल मीडियात नाराजी व्यक्त केली होती. तर मुंबईमध्ये 'नॉक नॉक सेलिब्रिटी' या नाट्यप्रयोगाच्या वेळेस मोबाईल फोन वाजल्याने अभिनेता सुमित राघवन याने प्रयोग थांबवला होता. फेसबूकच्या माध्यमातूनही त्याने आपला राग व्यक्त केला होता. मात्र आता जॅमर बसवण्यात येणार असल्याचे हे प्रकार थांबणार याची अपेक्षा केली जात आहे.