दिग्दर्शक विजू माने यांच्यासोबत आज एक जीवघेणी घटना घडली आहे. लिफ्ट अचानक बंद पडल्याने आतमध्ये अडकून पडण्याची जीवघेणी घटना ठाणे शहरातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात विजू माने यांच्यासोबाबत घडली. त्याबद्दल सोशल मीडियावर एक पोस्ट लिहीत, सर्व नाट्यप्रेमींना या घटनेबद्दलची माहिती दिली आहे.
विजू माने हे आज एका कार्यक्रमानिमित्त काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात गेले होते. परंतु, व्हिआयपी लिफ्टमधून कार्यक्रम स्थळी जात असताना अचानक लिफ्ट बंद पडली आणि ते अर्ध्यावरच अडकले. बाहेर निघण्याचा अथक प्रयत्न करूनही त्यांना ते शक्य झाले नाही. आणि अखेरीस नाट्यगृहाच्या सुरक्षाकर्मींनी घटनास्थळी पोहोचून विजू माने यांना लिफ्टमधून बाहेर काढले आहे.
या प्रसंगाचं गांभीर्य लक्षात घेता, अनेक सिनेकलाकारांनी विजू माने यांच्या पोस्टवर नाट्यगृहांच्या दुरावस्थेविषयी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान, या आधी अभिनेते सुमित राघवन यांनी देखील ठाण्यातील नाट्यगृहांच्या दुरावस्थेविषयी आवाज उठवला होता. त्याचसोबत अनेक मराठी कलाकारांनी डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले या नाट्यगृहाची असलेली बिकट परिस्थिती व्हिडिओच्या माध्यमातून जनतेपुढे मंडळी होती. परंतु प्रशासन या सर्व बाबींकडे कधी गांभीर्याने घेणार हे बघणं महत्त्वाचं ठरेल.