Dadasaheb Phalke Awards 2020: हृतिक रोशन सर्वोत्कृष्ट अभिनेता तर सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान 'सुपर 30' ला; पहा सन्मानित कलावंतांची यादी
Dadasaheb Phalke International Film Festival Awards 2020 (Photo Credits: Twitter)

Dadasaheb Phalke Awards 2020: दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळा 2020 हा काल (गुरुवार, 20 फेब्रुवारी) मुंबईत पार पडला. चित्रपट आणि टेलिव्हीजन साठी प्रतिष्ठीत समजल्या जाणाऱ्या या पुरस्कार सोहळ्याला अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली. या दिमाखदार सोहळ्याचे सुत्रसंचालन अभिनेता रवी दुबे यांनी केले. यावेळी रेड कार्पेटवर दिया मिर्झा, रितेश देशमुख, हर्षद चोपडा, दिव्यांका त्रिपाठी अन्य सेलिब्रेटींनी हजेरी लावली. पुरस्कार सोहळ्यातील मलायका अरोरा हिचा पारंपारिक लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात साऊथ स्टार सुदीप, हर्षद चोपडा, दिव्यांका त्रिपाठी यांनी पुरस्कार पटकावले. (Dadasaheb Phalke Awards 2020: उद्या मुंबईत रंगणार दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळा; टीव्ही अभिनेता रवी दुबे करणार सूत्रसंचालन)

पुरस्कारांची ही सुवर्ण मैफील अभिनेता हृतिक रोशन याच्यासाठी देखील अत्यंत खास ठरली. हृतिका याच्या सुपर 30 सिनेमाला सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि याच सिनेमासाठी हृतिकला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. तर साऊथ स्टार सुदीप याला मोस्ट प्रॉमिसिंग अॅक्टर हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. तर सर्वोत्कृष्ट टेलिव्हीजन अभिनेत्री म्हणून ये है मोहब्बतें स्टार दिव्यांका त्रिपाठी हिने वर्णी लावली.

विजेत्यांची यादी:

# सर्वोत्कृष्ट चित्रपट: सुपर 30

# सर्वोत्कृष्ट अभिनेताः हृतिक रोशन

# मोस्ट प्रामिसिंग अॅक्टरः सुदीप

# सर्वोत्कृष्ट टेलिव्हीजन अभिनेताः धीरज धूपर

# सर्वोत्कृष्ट टेलिव्हीजन अभिनेत्रीः दिव्यांका त्रिपाठी

# मोस्ट फेव्हरेट टेलिव्हीजन अभिनेताः हर्षद चोपडा

# मोस्ट फेव्हरेट टीव्ही. मालिका जोडीः श्रीती झा आणि शब्बीर अहलूवालिया (कुमकुम भाग्य)

# सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रम (बेस्ट रियालिटी शोः) बिग बॉस 13

# सर्वोत्कृष्ट टीव्ही मालिकाः कुमकुम भाग्य

# सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक- अरमान मलिक

सिनेमा क्षेत्रात असामान्य कामगिरीबद्दल कलावंतांना दिला जाणारा हा सर्वोच्च पुरस्कार आहे. दादासाहेब फाळके यांच्या जन्मशब्तादीपासून भारत सरकारतर्फे हा पुरस्कार दिला जातो.