Dadasaheb Phalke Awards 2020 (संग्रहित संपादित रातिमा)

उद्या, 20 फ्रेब्रुवारी रोजी मुंबईमध्ये चित्रपटसृष्टीमधील महत्वाचा दादासाहेब फाळके पुरस्कार (Dadasaheb Phalke International Film Festival Awards 2020) सोहळा पार पडणार आहे. दादासाहेब फाळके पुरस्कार हा भारत सरकारच्या वतीने देण्यात येणारा एक वार्षिक पुरस्कार आहे. या पुरस्कार एखाद्या व्यक्तीला त्याच्या भारतीय चित्रपटसृष्टीतील आजीवन योगदानासाठी दिला जातो. 1969 पासून, दादासाहेब फाळके यांच्या जन्मशताब्दीपासून या पुरस्कारास प्रारंभ झाला.

डायरेक्टरेट ऑफ फिल्म फेस्टिव्हलकडून, नॅशनल फिल्म अवॉर्ड्समध्ये विजेत्यास हा पुरस्कार प्रदान केला जातो. ही संपूर्ण प्रक्रिया केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीत येते.

दबंग 3 मधील किच्चा सुदीपने (Kiccha Sudeep) जवळपास दशकानंतर बॉलिवूडमध्ये पुनरागमन केले आहे. आता किच्चा सुदीपला या चित्रपटासाठी मोस्ट प्रॉमिसिंग अ‍ॅक्टरचा पुरस्कार देण्यात येत आहे. किच्चा सुदीपला ‘दबंग 3’ चित्रपटासाठी, दादा साहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2020 मध्ये या पुरस्काराने गौरविण्यात येईल. दादासाहेब फाळके यांच्या 150 जयंतीनिमित्त किच्चा सुदीप यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. हा सोहळा 20 फेब्रुवारी रोजी मुंबईत होईल व महाराष्ट्राचे राज्यपाल सुदीप यांना हा पुरस्कार देणार आहेत.

(हेही वाचा: सिद्धार्थ शुक्लाच्या जेतेपदावर उभा राहिले अनेक प्रश्न; बिग बॉस 13 Scripted Show असल्याचे सांगत कलर्सच्या कर्मचाऱ्याने केला धक्कादायक खुलासा)

अभिनेता रवी दुबे (Ravi Dubey) दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2020 चे सूत्रसंचालन करणार आहे. 1969 साली राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांसाठी आयोजित 17 व्या सोहळ्यात, अभिनेत्री देविका राणी यांना पहिला दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला. तेव्हापासून हा पुरस्कार 'राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार' समारंभाच्या लक्ष्यित वर्षाच्या शेवटी किंवा पुढच्या वर्षाच्या सुरूवातीला घेण्यात सुरुवात झाली. सध्या दहा लाख रुपये आणि स्वर्णकमळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.