Asim Riaz & Sidharth Shukla Top 2 (Photo Credits: Voot)

टीव्ही अभिनेता सिद्धार्थ शुक्ला (Siddhartha Shukla) याची 'बिग बॉस 13' (Bigg Boss 13) च्या विजेतेपदी निवड झाली आहे. मात्र सिद्धार्थच्या विजयाच्या गोडपणामध्ये आता कटुता मिसळली आहे. बिग बॉसचे चाहते या शोच्या निर्मात्यांवर पक्षपाती असल्याचा आरोप करीत आहेत. त्यात विनरची औपचारिक घोषणा होण्यापूर्वी कलर्स चॅनेलच्या एका कर्मचाऱ्याने हा संपूर्ण शो फिक्स्ड असल्याचा आरोप केला आहे.

सिद्धार्थला कमी वोट्स मिळूनही आसिम रियाजला डावलून त्याला विजेता घोषित केले. याच कारणामुळे कलर्सच्या कर्मचाऱ्याने हा शो स्क्रिप्टेड असल्याचे सानागत आपली नोकरी सोडली आहे.

याबाबतचे एक ट्वीट सोशल मिडीयावर सध्या व्हायरल होत आहे, 'ज्यामध्ये ही कर्मचारी लिहिते, 'वाहिनीच्या क्रिएटिव्ह विभागात मी खूप काम केले. मात्र आता मी स्वतःची किंमत अजून कमी करून घेऊ शकत नाही. कमी वोट्स मिळूनही वाहिनीला सिद्धार्थ शुक्लाला विनर बनवायचे होते. अशा फिक्सड गोष्टींचा मी भाग होणार नाही. बिग बॉस-13 हा एक स्क्रिप्टेड शो आहे, ज्यामध्ये सिद्धार्थ शुक्ला हा विनर होणार हे आधीच निश्चित केले होते. सिद्धार्थची माजी गर्लफ्रेंड मनीषा शर्मा ही बीबी 13 ची क्रिएटिव्ह आणि प्रोग्रामिंग हेड आहे.'

दुसरीकडे आसिमच्या चाहत्यांनीही सिद्धार्थला विजेता बनवताना पूर्णपणे चुकीचे धोरण अवलंबल्याचा आरोप केला आहे. सिद्धार्थने संपूर्ण सीझनमध्ये फक्त भांडणे केली, ताकदीच्या बळावर अनेक टास्क जिंकले, असे असूनही वाहिनीने त्याला विजेता म्हणून घोषित केल्याने आता कलर्स वाहिनी बॅन करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. (हेही वाचा: Bigg Boss 13 Winner: सिद्धार्थ शुक्ला ठरला बिग बॉस 13 चा विजेता; आसिम रियाज दुसऱ्या, तर शहनाज गिल तिसऱ्या स्थानी)

सिद्धार्थ शुक्ला विजेता घोषित होताच, ट्विटरवर सिद्धार्थविरूद्ध मोहीम सुरू झाली आहे. ट्विटरवर #FixedWinnerSidharth ट्रेंड करत आहे. या हॅशटॅगमुळे लोक सिद्धार्थच्या निवडीवर प्रश्न उपस्थित करीत आहेत. शोचा खरा विजेता असिमचा असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.