Yohani Bollywood Debut: श्रीलंकेची गायिका योहानी करणार अजय देवगणच्या 'Thank God' चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये डेब्यू
Yohani ( pic credit - yohanai music instagram)

श्रीलंकेची (Sri Lanka) सेंसशनल गायिका योहानी (Yohani) तिच्या 'मानिके मागे हिते' (Manike Mage Hithe) या गाण्यामुळे रातोरात स्टार झाली. फक्त श्रीलंकेमध्येच नाही तर भारतामध्येही तिची मोठी क्रेझ पाहायला मिळत आहे. सध्या योहानी भारतामध्ये आहे व नुकतेच तिने बिग बॉसमध्येही आपली उपस्थिती दर्शवली होती. आता ही सोशल मीडिया सेन्सेशन योहानी लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. आता श्रीलंकेची योहानी अजय देवगणच्या 'थँक गॉड' (Thank God) चित्रपटासाठी तिच्या ब्लॉकबस्टर गाण्याचे हिंदी व्हर्जन गाणार आहे.

योहानीने स्वतः सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. योहानी आपल्या या बॉलिवूड पदार्पणाबाबत खूप उत्साही दिसत आहे. तिने इंद्र कुमारसोबतचा एक फोटोही शेअर केला आहे. इंद्र कुमार दिग्दर्शित अजय देवगण, सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि रकुल प्रीत स्टारर या चित्रपटाच्या निर्मात्यांनी योहानीच्या मूळ गाण्याची हिंदी आवृत्ती त्यांच्या चित्रपटात वापरण्याचा निर्णय घेतला आहे. योहानी हे हिंदी गाणे तिच्याच आवाजात गाणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Yohani (@yohanimusic)

दिग्दर्शक इंदर कुमार यांनी सांगितले की- ‘योहानीचे गाणे सुपर सेन्सेशन बनले आहे. ‘थँक गॉड’ या चित्रपटासाठी मला हा ब्लॉकबस्टर ट्रॅक दिल्याबद्दल मी भूषणजींचा आभारी आहे. या गाण्याच्या हिंदी आवृत्तीसाठी आम्ही खूप उत्साहित आहोत. लवकरच हा ट्रॅक चित्रित केला जाईल. यासह निर्माता भूषण कुमार म्हणाले- ‘प्रतिभावान कलाकार योहानीसोबत काम करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. आम्ही भारतीय चाहत्यांसाठी 'मानिके मागे हिते'ची पहिली देसी आवृत्ती आणत आहोत.’ (हेही वाचा: Katrina Kaif सोबत 'रोका' झाल्याच्या बातमीवर Vicky Kaushal ची प्रतिक्रिया, म्हणाला- 'लवकरच साखरपुडा करणार')

रिपोर्ट्सनुसार, तनिष्क बागजी हे गाणे संगीतबद्ध करतील आणि रश्मी विराग ते लिहितील. या चित्रपटात अजय तिसऱ्यांदा रकुल प्रीत सिंगसोबत काम करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ मल्होत्रा ​​'थँक गॉड'मध्ये मुख्य भूमिकेत असेल. हा चित्रपट पुढील वर्षी रिलीज होऊ शकतो.

दरम्यान, योहानीचे हे गाणे याआधी हिंदी, तामिळ, मल्याळम, बंगाली आणि इतर भाषांमध्ये अनेक लोकप्रिय कलाकारांनी रिक्रिएट केले आहे. योहानी श्रीलंका कोलंबो येथे राहते. ती एक गायक, गीतकार, रॅपर आणि संगीत निर्माता आहे. ती टिक टॉकवरही एक प्रसिद्ध सेलिब्रिटी आहे. तिला श्रीलंकेची 'रॅप प्रिन्सेस' म्हणूनही ओळखले जाते.