Year Ender 2020: अभिषेक बच्चन, बॉबी देओल, सुष्मिता सेनसह या बॉलिवूड कलाकारांनी वेब सीरिजमध्ये केला डेब्यू, पाहा संपूर्ण यादी
Web Series (Photo Credits: Instagram)

कोरोना व्हायरस आणि त्यात आलेले लॉकडाऊनमुळे सिनेमागृहे पूर्णपणे बंद होती. यामुळे लोकांचे मनोरंजनाचे माध्यम लोकांपासून दूर झाले. अशा वेळी OTT प्लेटफॉर्म्सनी लोकांचे मनोरंजन केले. OTT प्लेटफॉर्मच्या माध्यमातून लोकांनी अनेक वेबसीरिज (Webseries),अनेक चित्रपट पाहिले. या लॉकडाऊनदरम्यान OTT प्लेटफॉर्म्सनी सिनेमागृहांची जागा घेतली. लोकांचा OTT कडे कल पाहता अनेक दिग्गज कलाकारांनी देखील वेबसीरिजच्या माध्यमातून ऑनलाईन विश्वात पदार्पण केले. इतकेच नव्हे तर ज्यांनी ज्यांनी या वेबविश्वात पदार्पण केले त्यांच्या वेबसीरिज देखील तितक्याच हिट झाल्या.

त्यामुळे वर्षाअखेरीस कोणकोणत्या बॉलिवूड कलाकारांनी वेबसीरिजमध्ये डेब्यू केला याची थोडी फार उजळणी करुन घेऊया.

1. अभिषेक बच्चन- (ब्रीथ: इनटू द शैडोज)

ज्युनियर बच्चन अभिषेक बच्चन ब्रीथ: इनटू द शैडोज मधून आपला डिजिटल डेब्यू दिला. या वेबसीरिजमध्ये तो आर माधवनची ही वेबसीरिज बरीच चर्चेत राहिली. यात अभिषेकची भूमिका लोकांच्या पसंतीस उतरली.

2. बॉबी देओल (आश्रम)

बॉलिवूडमध्ये आपले वडिल धर्मेंद्र आणि भाऊ सनी देओल म्हणावी प्रसिद्धी न कमावू शकलेल्या बॉबी देओलने आश्रम या वेबसीरिजच्या माध्यमातून अनेकांची मने जिंकली. बॉलिवूडमधील सर्व कसर त्याने या वेबसीरिजमध्ये भरून काढली.हेदेखील वाचा- Top Global Asian Celebrity 2020: आशियाई सेलिब्रिटी 2020 च्या यादीत अभिनेता Sonu Sood अव्वल स्थानावर; अमिताभ बच्चन, प्रियंका चोप्रा, प्रभास यांना टाकले मागे

3. अरशद वारसी (असुर)

अरशद वारसी ने OTT प्लेटफॉर्मवर असुर नावाच्या वेबसीरिजमधून पदार्पण केले. यात अरशद वारसी जासूस दाखवला असून यात तो सीरियल किलर मागे लागल्याचे दिसत आहे.

4. करिश्मा कपूर (मेंटलहुड)

ऑल्ट बालाजीच्या मेंटलहुड या वेबसीरिजमध्ये करिश्मा कपूर हिने डिजिटल डेब्यू केला.

5. सुष्मिता सेन (आर्या)

सुष्मिता सेनने आर्या या वेबसीरिजमधून OTT प्लेटफॉर्मवर पदार्पण केले. यात तिचे काम अनेकांना भावले.

थोडक्यात 2020 मध्ये वेबसीरिजच्या माध्यमातून अनेक दिग्गज कलाकारांनी OTT प्लेटफॉर्मवर पदार्पण केली आणि एक चांगली सुरुवात केली. तर ज्या कलाकारांनी खूप महिन्यानंतर चित्रपटांकडे वळले त्यांच्यासाठी देखील वेबसीरिज चांगले माध्यम ठरले.