प्रियंका चोप्राच्या लग्नात जाऊबाईचा जलवा, प्रियांका-सोफीची फुगडी सोशल मीडियात व्हायरल
सोफी टर्नर | (Photo Courtesy: Instagram, abujanisandeepkhosla Verified)

हॉलीवुड-बॉलिवुडमधील चर्चीत कपल प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra)आणि निक जोनस यांचा विवाह पार पडला असला तरी, त्याचा कौतुकसोहळा प्रसारमाध्यमांतून अद्यापही सुरुच आहे. या जोडप्याने डिसेंबर 2018च्या पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी अनुक्रमे ख्रिश्चन आणि हिंदू पद्धतीने विवाह केला. या विवाहसोहळ्याचे व्हिडिओ आणि छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली. ज्याची दखल प्रसारमाध्यमांनीही घेतली. विवाहानंतर रिसेप्शन सोहळा वैगेरेही यथासांग पार पडला. असे असले तरी चाहते आणि प्रसारमाध्यमे यांना अद्यापही या दोघांच्या विवाहाचे भलतेच आप्रूप वाटत आहे. अशा या विवाहातला एक व्हिडिओ सोशल मीडियावर नुकताच व्हायरल झाला आहे. ज्यात प्रियंका चोप्रा (जोनस) आणि सोफी टर्नर (Sophie Turner) फुगडी खेळताना दिसत आहेत. आता ही सोफी टर्नर कोण? असा सवाल कदाचित काही मंडळी उपस्थित करतील. त्यांच्या माहितीसाठी असे की, 'गेम ऑफ थ्रोन्स' (Game Of Thrones) फेम सोफी टर्नर ही एक आघाडीची अभिनेत्री आहे. तसेच, तिची आणखी एक विद्यमान ओळख म्हणजे ती प्रियंका चोप्रा हिची थोरली जाऊबाई आहे.

विवाहातील संगीत सेरेमनीमध्ये प्रियंका चोप्राची जाऊबाई म्हणजेच सोफी टर्नर हिने जबरदस्त डान्स परफॉर्मन्स केला. जो पाहून उपस्थित मंडळी भाराऊन गेले. या परफॉर्मन्सवेळी सोफीने लाल रंगाचा लेहेंगा घातला होता. ज्यात तिचे सौंदर्यअधिकच उठून दिसत होते. सोफी टर्नर ही एक आघाडीची अभिनेत्री आहे. तिने 'गेम ऑफ थ्रोन्स'मध्ये सेन्साची भूमिका साकारली होती. निकचा भाऊ जो जोनसची पत्नी सोफीची या विवाहसोहळ्यावेळी जोरदार चर्चा होती. विशेष असे की, विवाहामध्ये निक परिवार भारतीय कपड्यांमध्येच पाहायला मिळाला.

 

View this post on Instagram

 

#PriyankaChopra #PriyankaChopraNickJonasWedding #PriyankaNick #PcNick #NickJonas

A post shared by Entertainment Fan Page (@facc2911) on

या विवाहात प्रियंका चोप्राची आई मधू चोप्रा, भाऊ सिद्धार्थ चोप्रा, परिणिती चोप्रा आणि परिवारातले इतर जवळची मंडळी पाहायला मिळाले.

महत्त्वाचे म्हणजे या विवाहावेळी प्रसारमाध्यमांनाही प्रवेश देण्यात आला नव्हता.तसेच, उपस्थित पाहुण्यांना मोबाईल आणि कॅमेरा वापरण्यास परवानगी नव्हती. त्यामुळे सुरुवातील विवाहातील दृश्ये चाहत्यांना पाहायला मिळाली नाहीत. पण, आता हळूहळू ती चाहत्यांसाठी उपलब्ध होत आहेत.