फिल्ड मार्शल सैम मानेकशॉ च्या भूमिकेतील 'विकी कौशल' चा लूक सोशल मिडियावर व्हायरल
Vicky Kaushal (Photo Credits: Twitter)

'Where is the Josh' या आपल्या दमदार डायलॉग प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनलेला अभिनेता  विक्की कौशल (Vicky Kaushal) तो जोश परत घेऊन एका नव्या भूमिकेत आपल्या समोर येणार आहे. 1971 मध्ये बांगलादेश मुक्तीसाठी झालेल्या संग्रामात पाकिस्तानला गुडघे टेकायला लावणारे भारतीय सैन्याचे पहिले फिल्ड मार्शल सैम मानेकशॉ (Sam Manekshaw) यांच्या आयुष्यावर दिग्दर्शिका मेघना गुलजार (Meghna Gulzar) चित्रपट बनवणार आहे. या चित्रपटात अभिनेता  विक्की कौशल सैम मानेकशॉ यांच्या भूमिकेत दिसणार आहे.

'मुंबई मिरर' ला दिलेल्या मुलाखतीत मेघना गुलजार यांनी सांगितले की, ' विक्की ला या भूमिकेबद्दल विचारण्याआधी मला कथेचा ड्राफ्ट पुर्ण करायचा होता. त्याला भेटून मी त्याला सैम मानेकशॉ विषयी सांगितले. त्याच दिवशी तो चित्रीकरणासाठी अमेरिकेला जायला निघणार होता त्यामुळे त्याला स्क्रिप्ट वाचायला वेळ मिळणार नव्हता. पण त्यानं स्क्रिप्ट न वाचताच भूमिका साकारायला होकार कळवला. मी त्याला स्क्रिप्ट वाचून, पुन्हा एकदा याबद्दल विचार करून फोन करण्यास सांगितले. त्याने ती स्क्रिप्ट वाचली आणि त्याला कथा आवडल्याचे मला कळवले."

त्यातच आज सैम मानेकशॉ यांची पुण्यतिथी असून त्यानिमित्तानं विक्की ने नुकताच त्याचा चित्रपटातील फर्स्ट लूक सोशल मिडियावर शेअर केला.

'भारताचे पहिले फिल्ड मार्शल, सैम मानेकशॉ यांची भूमिका साकारायची संधी मला मिळाली आहे. एक सच्चा देशभक्त पडद्यावर साकारायला मला मिळणार आहे. या निर्भय देशभक्ताचा प्रवास मोठ्या पडद्यावर उलगडण्यासाठी मी प्रचंड उत्सुक आहे. मी त्यांची भूमिका साकारतोय याचा मला अभिमान आहे.' अशा शब्दात त्याने मानेकशॉ यांचे वर्णन केले आहे.

हेही वाचा- 'Bhoot: Part One - The Haunted Ship' फर्स्ट लूक रिलीज, चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अभिनेता विक्की कौशलला पडले होते 13 टाके

या चित्रपटाचं दिग्दर्शन मेघना गुलजार करणार असून २०२१ मध्ये चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे.