'Bhoot: Part One - The Haunted Ship' फर्स्ट लूक रिलीज, चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अभिनेता विक्की कौशलला पडले होते 13 टाके
Bhoot First Look (Photo Credits: Twitter)

'Where is the Josh' या एका डायलॉगने सर्वांच्या अनेक तरुणींना अक्षरश: वेडं लावलेल्या अभिनेता विक्की कौशल (Vicky Kaushal) याचा ‘भूत पार्ट वन – द हाँटेड शीप’ (Bhoot: Part One - The Haunted Ship) नवीन चित्रपट लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. करण जौहरच्या(Karan Johar) धर्मा प्रोडक्शनच्या (Dharma Productions) बॅनरखाली ह्या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. मसान'पासून ते अलीकडेच आलेल्या 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक' यांसारख्या चित्रपटामधून वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका करून विक्की कौशल ने प्रेक्षकांची मने जिंकली. भूत या सिनेमातही तो एक वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकताच त्याने आपल्या इन्स्टा अकाउंटवरुन ह्या चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज केला.

‘भूत पार्ट वन – द हाँटेड शीप’चित्रपटाचे अनेक भाग येणार आहेत. यातला पहिला भाग ‘भूत- द हाँटेड शिप’ 15 नोव्हेंबर 2019 मध्ये प्रदर्शित होणार आहे. आतापर्यंत करणच्या धर्मा प्रोडक्शनने अनेक रोमँटीक चित्रपटांची निर्मिती केली आहे. या चित्रपटातील भूमिकेसाठी विक्की कौशल विशेष मेहनत घेतली असून याच्या चित्रीकरणादरम्यान त्याच्या गालाच्या हाडाला 13 टाके पडले होते. गुजरातमध्ये शूटिंग दरम्यान ही घटना घडली होती.

शूटिंगदरम्यान विक्की कौशलचा जबर अपघात; फ्रॅक्चरसह चेहऱ्यावर पडले 13 टाके

या चित्रपटाची कथा ही सत्या घटनेवर आधारित असल्याचे या चित्रपटाचे निर्माते शशांक खैतानने एका मुलाखतीत सांगितले आहे. या चित्रपटात विक्की कौशलसोबत भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) मुख्य भूमिकेत दिसणार आहे. धर्मा प्रोडक्शनने याआधी 'Kaal'(काल) हा भयपट सिनेमा केला होता. मात्र तो चित्रपट बॉक्सऑफिसवर चांगलाच आपटला. म्हणून करणला देखील या सिनेमाकडून ब-याच अपेक्षा असून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालणार का हे लवकरच कळेल.