Vicky Kaushal (Photo Credits: Instagram)

अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal)  हा लॉक डाउन (Lockdown) मोडत घराबाहेर पडल्याच्या आरोपातून त्याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे अशा चर्चा सोशल मीडियावर दोन दिवसांपासून ऐकू येत होत्या, या सर्व चर्चांवर आता स्वतः विकीनेच ट्विट करून भाष्य केले आहे. आपण कोणताही नियम मोडलेला नाही आणि आपल्याला पोलिसांनी अटकही केलेली नाही असे विकीने आपल्या ट्विट मधून स्पष्ट केले आहे. या ट्विट मध्ये त्याने मुंबई पोलिसांना (Mumbai Police) सुद्धा टॅग केले आहे. Lock Down काळात बॉलिवूड सेलिब्रिटी बनले शेफ; दीपिका पादुकोण, कार्तिक आर्यन सहित 'या' मंडळींनी बनवल्या लज्जतदार रेसिपी (See Photos)

काही दिवसांपूर्वी विकी कौशल राहत असणाऱ्या ओबेरॉय स्पिंग या इमारतीमध्ये कोरोनाचा रुग्ण आढळून आला होता परिणामी नियमानुसार ही इमारत मुंबई महापालिकेच्या वतीने सील करण्यात आली होती, याच बिल्डिंग मध्ये अभिनेता राजकुमार राव सुद्धा राहतो. यामुळे बिल्डिंग मधून बाहेर पडण्यासाठी तसेच बिल्डिंग मध्ये बाहेरील व्यक्तीस प्रवेश घेण्यावर बंदी घालण्यात आली होती. हे नियम मोडून विकी बाहेर गेल्याच्या चर्चा होत्या.

विकीला अटक केल्याच्या चर्चांवर त्याने स्वतःच स्पष्टीकरण देत सांगितले की, “मी लॉकडाउनचा नियम मोडून घराबाहेर फिरत असल्याच्या तथ्यहिन चर्चा अफवा पसरल्या जात आहेत. मात्र मी लॉकडाउन सुरू झाल्यापासून घराबाहेर पडलोच नाही. लोकांनी अशा अफवा पसरवू नये अशी मी विनंती करतो”.

विकी कौशल ट्विट

दरम्यान, लॉक डाऊन लागू झाल्यापासूनच विकी सोशल मीडियावरून वारंवार अनेकांना नियमाचे पालन करण्याचे आवाहन करत असतो. तर घरातच राहून तो आपला वेळ कसा घालवतोय याचेही अपडेट्स तो फॅन्सना देत असतो.